Xiaomi चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Redmi 9A आज(दि.9) भारतात सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने हा एन्ट्री लेवल स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन म्हणजे गेल्या वर्षी लाँच झालेल्या Redmi 8A ची नवीन आवृत्ती आहे. Redmi 9A स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा IPS HD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये असलेली बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. दुपारी १२ वाजेपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट (Mi.com) आणि ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर Redmi 9A च्या सेलला सुरूवात होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Redmi 9A स्पेसिफिकेशन्स :-
Redmi 9A हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत असेल. याशिवाय फोनमध्ये 6.53 इंचाचा IPS HD+ डिस्प्ले असून वाटरड्रॉप डिझाइन आहे. फोनमध्ये मीडियाटेक ऑक्टाकोर हीलियो G25 प्रोसेसर दिलं आहे. हा फोन 2/3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या पर्यायात उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी कंपनीने फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. तर, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. रिअर कॅमेऱ्यासोबत फ्लॅश लाइट देखील आहे. Redmi 9A मध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत बॅकअप देते असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन नेचर ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Redmi 9A ची किंमत :-
Redmi 9A स्मार्टफोनच्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 6,799 रुपये आहे. तर, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7,499 रुपये आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi redmi 9a goes on sale in india via amazon check price sas
First published on: 09-09-2020 at 11:31 IST