Yamaha Motor India कंपनीने भारतातील आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक Yamaha YZF-R15 V3.0 BS6 च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. कंपनीने या बाइकच्या एक्स शोरूम किंमतीत जवळपास 2,100 रुपयांची वाढ केली आहे. 2008 साली लाँच झाल्यापासून एंन्ट्री लेवल स्पोर्ट्स बाइक्समध्ये Yamaha YZF-R15 V3.0 चांगलीच लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ही बाइक कंपनीने इंजिनसाठी लागू झालेल्या नवीन निकषांसह म्हणजेच अपडेटेड बीएस-6 इंजिनमध्ये लॉन्च केली. तेव्हापासून दुसऱ्यांदा ही बाइक महाग झाली आहे. मे महिन्यातही कंपनीने किंमतीत वाढ केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Yamaha YZF-R15 V3.0 ही बाइक रेसिंग ब्लू, थंडर ग्रे आणि डार्कनाइट अशा तीन कलर व्हेरिअंटमध्ये भारतात उपलब्ध आहे. या बाइकची किंमत कलर ऑप्शननुसार बदलते. कंपनीने या तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ केली आहे. यामाहा YZF-R15 V3.0 मध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. यात एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, USB चार्जर , स्लिपर क्लच, ड्युअल हॉर्न, रेडियल ट्युबलेस टायर, साइड स्टँड इनहॅबिटर यांसारख्या अनेक फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाइकमध्ये ड्युअल-चॅनल एबीएस देखील आहे. या स्पोर्ट्स बाइकमध्ये 155cc, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन असून 6-स्पीड गिअरबॉक्स आहेत. फ्युअल-इंजेक्शन सिस्टिम असलेलं हे इंजिन 19hp ची ऊर्जा आणि 14Nm टॉर्क निर्माण करतं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yamaha r15 v3 0 price in india hiked again check new price specifications and other details sas
First published on: 06-08-2020 at 15:35 IST