Video Viral : सध्या महिला घर आणि नोकरी अशा दुहेरी जबाबदारी पार पाडतात. अनेक स्त्रिया कुटुंब, घर व नोकरी यामध्ये स्वत:ला इतक्या गुंतवून घेतात की, त्या स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, आज आम्ही तुम्हाला प्रत्येक स्त्रीने न चुकता करावीत अशी तीन योगासने सांगणार आहोत.

योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी तीन योगासने करून दाखवत आहेत. ती तीन योगासने आणि त्यांचे फायदे खालीलप्रमाणे :

if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
blonde roasts Coffee Health Benefits
Varun Dhawan: ब्लॅक कॉफी व्यतिरिक्त ‘हा’ पर्याय आतड्यासाठी ठरेल योग्य; वरुण धवनने सुचवला उपाय; पण, तज्ज्ञांचे मत काय?
Which is the best time to exercise
तुम्हालाही व्यायामाची आवड आहे? मग, थांबा… कधीही व्यायाम केल्याने उदभवू शकतात गंभीर समस्या
ladies group dance on Tuzya Pritit Zale Khuli marathi song video goes viral
VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक

१. उत्कट कोणासन

या आसनामुळे पेल्विक फ्लोर मजबूत बनतो. मासिक पाळीच्या तक्रारी दूर होऊ शकतात. पाय व मांड्यांच्या स्नायूंची ताकद वाढते.

२. मलासन

या आसनामुळे पचनशक्ती सुधारते, प्रजननसंस्था सुधारते आणि पाय मजबूत होतात.

३. बद्धकोणासन

बद्धकोणासन केल्यामुळे मन शांत राहते. मूत्राशय, गर्भाशय यांचे आरोग्य सुधारते आणि लवचिकता वाढते.

हेही वाचा : आईची हिल्स घालून चिमुकलीने केला चालण्याचा सराव, क्युट व्हिडीओ एकदा पाहाच…

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भारतीय स्त्रिया कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. त्यासाठी चालणे, व्यायाम, योगा करणे या बाबींना तुमच्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग बनवून घ्या. कारण- त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. व्हिडीओत दाखवलेली तीन योगासने ही महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहेत. प्रत्येक योगासन एक ते दोन मिनिटे करावे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान.” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच ही योगासने खूप फायदेशीर आहेत.” आणखी एका युजरने लिहिलेय, “वजन कमी करण्यासाठीही काही योगासने सांगा.”

Story img Loader