सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे विविध वयोगटातील लोकांमध्ये कंबरदुखीची समस्या उद्भवलेली दिसून येते. पारंपरिक योगशास्त्रात या समस्येवर उपयुक्त असे आसन देण्यात आले आहे. भूनमनासन असे या आसनाचे नाव असून ते नियमित केल्यास कंबरदुखीपासून सुटका होऊ शकते. हे तोलात्मक आसन असून डोके जमिनीवर टेकवून करायचे असते. दंड स्थितीत उभे राहून दोन्ही पायांमध्ये योग्य ते अंतर घ्यावे. मग डावा पाय जास्तीत जास्त लांब करावा. गुडघ्यात वाकू देऊ नये. यानंतर कंबरेत वाकून डोके डाव्या पायाच्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. हळूहळू डोके डाव्या पावलाजवळ न्यावे आणि जमिनीवर टेकवावे. हे आसन आलटून पालटून दोन्ही पायाने करावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसन करताना दोन्ही हात कंबरेभोवती लपेटावेत. सुरुवातीला आपल्याला जमत नाही असे वाटत असेल तर दोन्ही हातांपैकी एक हात कंबरेभोवती लपेटून दुसऱ्या हाताचा आधार घेता येतो. मात्र कोणतेही आसन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हे आसन करताना आपण ज्या पायाजवळच्या जमिनीवर आपण डोके टेकवणार आहोत तिथे मऊ कापडाची जाडसर घडी ठेवावी त्यामुळे डोक्याला खडबडीत लागत नाही. श्वास सोडत डोके जमिनीला टेकवावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga bhunamanasan useful for backpain
First published on: 06-09-2017 at 11:00 IST