How to lower blood pressure: जगात बीपीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उच्च रक्तदाब हा चुकीच्या आहारामुळे आणि बिघडत्या जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे. वाढता ताण आणि जेवणात जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते. कोणत्याही व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० मिमीएचजीपर्यंत असतो. कमी रक्तदाब आणि जास्त रक्तदाब या दोन्ही परिस्थितींमुळे त्रास होतो. जेव्हा उच्च रक्तदाब असतो तेव्हा अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागतात.

जर उच्च रक्तदाबावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जर बराच काळ उपचार केले गेले नाहीत तर हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचा आजार आणि दृष्टी कमी होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांझेर यांच्या मते, “रक्तदाबाचे रुग्ण औषधाशिवायही रक्तदाब नियंत्रित करू शकतात. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलून, रक्तदाब केवळ सामान्य करता येत नाही तर तो उलटदेखील करता येतो.”

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय

काही औषधी वनस्पतींमध्ये शक्तिशाली फायटोकेमिकल्स भरपूर असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात आणि मज्जासंस्था शांत करण्यास मदत करतात. नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ (NCCIH) ने रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी लसूण, आले आणि हिबिस्कस फुले खाण्याची शिफारस केली आहे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, लसणात असलेले ॲलिसिन, आल्यामध्ये असलेले जिंजरॉल आणि हिबिस्कसच्या फुलांमध्ये असलेले पॉलीफेनॉलसारखे संयुगे रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि रक्तदाब नियंत्रित करतात.

मिठावर नियंत्रण

जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर तुमच्या दैनंदिन आहारात मिठाचे सेवन नियंत्रित करा. सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तदाब झपाट्याने वाढतो.

ओव्याने रक्तदाब सामान्य करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओवा हा स्वयंपाकघरातील एक मसाला आहे, ज्यामध्ये फॅथलाइड्स असतात, जे रक्त प्रवाह सुधारतात. ओवा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

योग आणि ध्यान करा

ताणतणाव हे सर्व आजारांचे मूळ आहे. ताण नियंत्रित करण्यासाठी योग आणि ध्यान करा. ताण नियंत्रित करून तुम्ही तुमचे रक्तदाब सामान्य करू शकता. ताण नियंत्रित करण्यासाठी पुरेशी झोप घ्या. ७-८ तासांची झोप तुमचा ताण नियंत्रित करेल आणि तुमचा रक्तदाब सामान्य राहील.