स्त्री जीवनात अतिरक्तस्रावामुळे किती त्रास होऊ शकतो आणि त्यावर उपचार कसे करावयास हवेत हे आपण जाणून घेतले, पण केवळ संप्रेरकांमुळेच अतिरक्तस्राव होतो असे नाही तर गर्भाशयावर तयार होणारे मांसाचे गोळे, गर्भाशयाच्या आतील आवरणापासून तयार होणाऱ्या गाठी यामुळेही काही वेळेस रक्तस्राव होऊ शकतो.

खरं तर गर्भाशयावरील गाठींचे प्रकार आहेत. सर्वच गाठींमुळे त्रास होईल असे नाही. गर्भाशयाच्या बाह्य आवरणावरील (सबसिरोसल- फायब्रॉइड) गाठी, गर्भाशयाच्या मांसल आवरणात तयार होणाऱ्या गाठी (इन्ट्राम्युरल फायब्रॉइड) गर्भाशयाच्या आतील आवरणातून वाढणाऱ्या गाठी (सबम्युकोसल फायब्रॉइड) असे विविध प्रकार. असे असले तरी सगळ्याच वाढलेल्या गाठींमुळे रक्तस्राव होत नाही. गर्भाशयाच्या गाठीचे आकारमान आणि त्यांची जागा म्हणजे ते गर्भाशयाच्या कोणत्या भागावर आहेत, तसेच त्यांची पोटातील जागा
उदा. ब्रॉड लिगामेंट फायब्रॉइड. गाठीच्या  वाढीमुळे कधी कधी मूत्रनलिकेवर दाब पडतो. सर्वसाधारण दोन सेंटीमीटर आकारमानापर्यंत काहीही लक्षणे दिसत नाहीत. काही वेळेस सहज केलेल्या पोटाच्या अल्ट्रासोनोग्राफीत हे फायब्रॉइडस आढळतात. मात्र आकारमानाने अधिक असलेली गाठ वा पोटाचा घेर अचानक वाढल्याने केलेल्या सोनोग्राफीतील गाठ विचारात घेण्यास हवी. यासाठी औषधे वा शस्त्रक्रिया
आदी उपचार स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मतानुसार घ्यावा. काही वेळेस गर्भाशयात निर्माण झालेली गाठ गर्भाशयाच्या ग्रीवेच्या मुखापर्यंत पसरते अशावेळची शस्त्रक्रिया कठीण असते, पण शस्त्रक्रिया करून घेणे भाग आहे.
अनेकदा प्रसूतीच्या वेळी केली जाणारी सिझेरिअन ही शस्त्रक्रिया करताना अचानक गर्भाशयावर अनेक छोटय़ा वा मोठय़ा गाठी गर्भाशयावर दिसतात. प्रसूतीनंतर त्याच वेळी ही शस्त्रक्रिया करणे स्त्रीरुग्णास अपाय पोचवू शकते. तेव्हा अशी शस्त्रक्रिया साधारण दोन ते तीन आठवडय़ांनंतरच करावी लागते. म्हणूनच शस्त्रक्रियेची खरी आवश्यकता स्त्रीरोगतज्ज्ञ जाणतात. त्यानुसारच आपण निर्णय घ्यावा.
शस्त्रक्रियेचा पर्याय सर्वस्वी स्त्रीरुग्णास होणाऱ्या त्रासावर, अल्ट्रासोनोग्राफीत दाखवलेल्या आकारमानावर, सीटी स्कॅनमध्ये दाखविलेल्या अवयवांच्या स्थिती व गाठीच्या आकारमानावर अवलंबून असतो. काही वेळेस रक्त कमी असल्यास प्रथम स्त्रीरुग्णास शस्त्रक्रियेसाठी योग्य करावे लागते.
गर्भाशयाच्या अशा वाढणाऱ्या गाठींमुळे रक्तस्राव जसा अधिक होतो, तसा तो अतिकमीसुद्धा होऊ शकतो. ओटीपोटात दुखणे, अपचन होणे, सतत कंबर दुखणे, कंबरदुखी, सफेद पाणी जाणे अशा नानाविध लक्षणांनी स्त्री डॉक्टरांकडे जाते आणि उपचार व तपासणीअंती गर्भाशयावर गाठी असल्याचे दिसून येते.
गर्भाशयावर कोणतीही शस्त्रक्रिया करावयाची असली तरी सर्वप्रथम रक्त तपासण्या, ईसीजी, एक्स-रे, पॅप स्मिअर यानंतर डायलटेशन व क्युरेटाज करणे भाग असते. कोणत्याही गर्भाशयाच्या गाठीसमवेत कर्करोग नाही ना याची दक्षता घ्यावी लागते. त्यानंतर गाठ आजूबाजूच्या आवरणापासून वेगळी काढावी लागते. यालाच ‘मायोमेकटॉमी’ म्हणतात. परंतु ५ ते ६ पेक्षा अधिक गर्भाशयाच्या गाठी असतील तर संपूर्ण गर्भाशय काढून टाकणे हितावह ठरते. महत्त्वाची गोष्ट अशी की, अविवाहित स्त्रीसाठी अशी शस्त्रक्रिया करावयाची असेल तर वयोमानानुसार वा लक्षणांनुसार गर्भाशय काढून टाकण्यास परवानगी घ्यावी लागते, तसेच विवाहित स्त्रियांमधील प्रश्न असाच सोडवावा लागतो.

Chaturgrahi Yog
४८ तासांनी ४ ग्रहांची महायुती; येत्या मंगळवारपासून ‘या’ राशी पैशाच्या बाबतीत ठरतील भाग्यवान? कुणाच्या संपत्तीत होणार वाढ?
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
How To Make Amchur At Home kairichi Amboshi Pickle recipe
आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

औषधे, शस्त्रक्रिया
एकंदरीत गर्भाशयांवरील गाठी किती व कुठे आहेत. त्यामुळे इतर काही त्रास त्या रुग्णास होत आहे का, यावर कोणत्या पद्धतीने उपचार करावा हे स्त्रीरोगतज्ज्ञ जाणतात. हल्ली अशा गाठी कमी होण्यास औषधे आली आहेत, तर काही संप्रेरक द्रव्ये असलेली तांबी. आपल्याला होत असलेला त्रास शस्त्रक्रियेमुळे जर पूर्ण बंद होत असेल तर शस्त्रक्रियाही चांगल्याप्रकारे आपल्याला उपयोगी पडते. तेव्हा स्त्रीरोगतज्ज्ञ याबाबतीत योग्य सल्ला देऊ शकतात.
rashmifadnavis46@gmail.com