डॉ. अश्विनी भालेराव-गांधी, स्त्रीरोगतज्ज्ञ

स्तनपानाचे फायदे बाळाबरोबर आईलाही होत असतात. हे फायदे केवळ शारीरिक नसून मानसिकही असतात. स्तनपानामुळे आई व बाळामधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते. त्यामुळेच प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापल्यानंतर लगेचच बाळाला आईच्या छातीशी धरले जाते. याच्या मागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत. आठ ते नऊ महिने बाळ गर्भात सुरक्षित असते. मात्र गर्भाच्या बाहेर आल्यानंतर बाळाला ऊब आवश्यक असते. जी त्याला आईजवळ मिळते. बाळाला आईच्या छातीशी धरताना आईला पान्हा फुटतो व आईला दूध येण्यास अडचणी येत नाहीत.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?

बाळाच्या जन्मानंतर त्याला प्रथम आईचे दूधच द्यावे. आईचे दूध हे अमृत मानले जाते. जन्मापासून ते पुढील सहा महिने बाळाला केवळ आईचेच दूध द्यावे. बाहेरच्या दुधाचा व पाण्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला पहिले सहा महिने बाहेरील दूध देऊ नये. प्रसूतीनंतर प्रथमच आईला येणारे दूध हे घट्ट व पिवळसर रंगाचे असते याला चीक-दूधही म्हटले जाते. यामध्ये पोषकद्रव्ये असल्याने बाळाला हे दूध हमखास द्यावे. या दुधामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते. बाळाचे पहिले लसीकरण म्हणजे चीक-दुधाचे सेवन. जन्मत: बाळ अशक्त असेल तर या दुधाचा बाळाला चांगला फायदा होतो. त्याशिवाय बाळाला बाटलीतून दूध देऊ नये, यामुळे बाळ आळशी बनण्याची शक्यता असते. बाळाला स्वत:हून चोखण्याची सवय असावी. स्तनपान करताना बाळाला एका बाजूने किमान १५ ते २० मिनिटे किंवा बाळ स्तन सोडेपर्यंत दूध पिऊ द्यावे. पहिली पाच मिनिटे स्तनातून जास्त प्रमाणात द्रव पदार्थ येतात व नंतर मात्र दूध घट्ट येते.

बाळाला दूध कसे पाजावे?

स्तनपान देताना आईने मानसिक ताण, संदेह, संकोच ठेवू नये. दुधाची निर्मिती व दूध स्रवणे या क्रिया मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात. बाळाला स्तनपान देताना बाळाचे कपडे काढून त्याला मोकळे करावे. खुर्चीवर, जमिनीवर किंवा पलंगावर कुठेही बसून स्तनपान द्यायला हरकत नाही. मात्र पाठ अवघडू नये यासाठी पाठीला आधार असावा. अशा वेळी एका कुशीला झोपून स्तनपान दिले तरी चालेल. या वेळी बाळाचे

शरीर स्वत:कडे वळवून घ्यावे आणि आईच्या अगदी निकट असावे. बाळाच्या डोक्याला, मानेला आणि पाठीला एका हाताने आधार द्यावा. आईने दुसऱ्या हाताने स्तनाग्रे आणि स्तनमंडल बाळाच्या तोंडात द्यावे. केवळ स्तनाग्रेच नाही तर स्तनमंडल बाळाच्या तोंडात जाणे आवश्यक आहे. आई व बाळाची स्थिती योग्य असल्याने स्तन व्यवस्थित चोखता येते आणि भरपूर दूध येते. नाही तर स्तनांग्रांवर चिरा पडू शकतात.

काही समस्या

  • बाळाने चुकीच्या पद्धतीने स्तन पकडल्यामुळे किंवा केवळ स्तनाग्रे चोखल्यामुळे दूध कमी येते. अशा वेळी बाळ जोराने व जास्त वेळ स्तनाग्रे ओढतो. त्यामुळे स्तनाग्रांवर व्रण उठतात.
  • प्रसूतीनंतर २ ते ३ दिवसांनी खूप दूध तयार होते. मात्र काही कारणाने हे दूध बाळापर्यंत पोहोचले नाही तर दुग्धग्रंथीमध्ये साठून राहते. यामुळे स्तन ताठरतात व टणक होतात. यासाठी बाळाला योग्य पद्धतीने स्तन पकडायला शिकवणे आवश्यक आहे. स्तनपानानंतर उरलेले दूध आईने अलगदपणे काढून टाकावे. गरम पाण्यात फडके भिजवून स्तन शेकल्यास दुखणे कमी होते.
  • सिझेरियन शस्त्रक्रियेने प्रसुती झाली असेल तर स्तनपान करण्यात अडथळा निर्माण होतो. भूल दिलेली असल्याने तात्काळ स्तनपान करता येत नाही. अशा वेळी डॉक्टरांच्या मदतीने प्रसूतीनंतर किमान चार तासांनंतर तरी स्तनपान सुरू करावे.
  • कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये केमोथेरेपी व औषधांचा मारा असल्याने स्तनपान करण्यात मनाई केली जाते.
  • शरीरात रक्ताची कमतरता असल्यास दूध येण्यास अडथळा निर्माण होतो.
  • प्रसूतीनंतर अनेकदा नातेवाईक व मित्रपरिवार महिलेच्या मनात स्तनपानाबद्दल भीती निर्माण करतात. काय खावे, कसे खावे व कधी खावे यांसारखे असंख्य सल्ले दिले जातात. अशा परिस्थितीत महिलेच्या मनात भीती निर्माण होते आणि स्तनपानात मानसिक स्थिती चांगली असणे आवश्यक असते. मात्र भीतीपोटी आईला दूध येण्यास अडथळा निर्माण होतो.
  • स्तनपानाची नेमकी प्रक्रिया माहिती नसल्यास किंवा स्तनपान करताना अडचण येत असेल तर काही घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • प्रसूतीनंतर ८ ते १२ तास स्तनपान न केल्याने स्तनात अतिरिक्त दूध जमा होते. अनेकदा हे दूध कपडय़ांबाहेर स्रवते अशा वेळी ३ ते ४ तासांनंतर महिलांनी स्वच्छतागृहात किंवा स्वच्छ जागी जाऊन स्तनातील अतिरिक्त दूध स्टिलच्या घट्ट झाकणाच्या डब्यात काढून घ्यावे. हे दूध साधारण आठ तास चांगले राहू शकते. घरी गेल्यानंतर बाळाला हे दूध द्यावे.

माता-बालकांस फायदा

बाहेरील दूध आणणे, त्यासाठी वापरले जाणारे भांडे, त्यात घातलेले पाणी -यांमुळे दुधात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र आईचे दूध थेट बाळाच्या तोंडात जात असल्याने ते जंतुविरहित असते. स्तनपान घेणाऱ्या बाळांमध्ये सहसा दमा, त्वचेचे संसर्ग आदी आजारांचा संसर्ग होत नाही. स्तनपानामुळे आईच्या शरीरात ऑक्झिटोसिन हा अंतस्राव तयार होतो. या अंतस्रावामुळे गर्भाशय आकुंचन पावते. त्यामुळे प्रसूतीनंतर रक्तस्रावाचे प्रमाण कमी होते. नियमित स्तनपान केल्यामुळे महिलेच्या शरीरातील प्रोल्याक्टिन बीजकोषातून बीज बाहेर येण्याची क्रिया मंदावते. यामुळे शारीरिक संबंध आले तरी गर्भ राहण्याची शक्यता कमी होते. ही प्रक्रिया साधारण दोन ते चार महिन्यांपर्यंत सुरू राहते. स्तनपानामुळे आईचे स्तन बेढब होत असले तरी गर्भारपणात वाढलेले वजन स्तनपानामुळे कमी होते.