एकीकडे सर्वच क्षेत्रांत घोडदौड करणाऱ्या स्त्रियांची आरोग्याच्या बाबतीत मात्र काहीशी हेळसांडच होते. स्त्रियांना मासिक पाळी, गर्भारपण, प्रसूती, बाळंतपण, रजोनिवृत्ती अशा विविध अवस्थांमधून जावे लागते. आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाच्या गाठी, गरोदरपणातील गुंतागुंती, वारंवार गर्भपात अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आयुर्वेद चिकित्सेचे महत्त्वाचे अंग असलेले पंचकर्म स्त्रियांसाठी कसे उपयोगी पडू शकेल ते पाहू या.

Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
  • आयुर्वेदानुसार स्त्रीरोगांचे महत्त्वाचे कारण म्हणजे वातदुष्टी. वातदुष्टीवर ‘बस्ती’ हे पंचकर्म गुणकारी समजले जाते. काढा व औषधी तेलाचा वापर करून एक प्रकारे ‘एनिमा’ दिल्यासारखे बस्ती या कर्माचे स्वरूप असते. बहुतांश स्त्रीरोगांवर बस्तीचा उपयोग केला जातो. बस्तीचे विविध प्रकार आहेत. केवळ तेलाचा बस्ती म्हणजे ‘अनुवासन बस्ती’. औषधी तेलाच्या मापानुसार त्याचे ‘स्नेह बस्ती’, ‘अनुवासन बस्ती’ व ‘मात्रा बस्ती’ असे प्रकार आहेत. काढा आणि तेलाचा बस्ती म्हणजे ‘निरूह बस्ती’ आणि योनीमार्गे गर्भाशयात दिला जाणारा बस्ती म्हणजे ‘उत्तरबस्ती’.
  • मासिक पाळी अनियमित येणे, कमी प्रमाणात येणे, किंवा अजिबात न येणे, पाळीच्या वेळी पोटात दुखणे, प्राय: काळसर स्राव असणे, मासिक पाळी वारंवार येणे व अधिक रक्तस्राव होणे, वारंवार गर्भपात होणे अशा तक्रारींवर बस्तीचिकित्सा उपयुक्त ठरू शकते. अर्थात त्यासाठी व्याधीची अवस्था आणि त्याचे कारण याचे आधी परीक्षण केले जाते. रुग्णाच्या प्रकृतीनुसार बस्तीमध्ये दिल्या जाणाऱ्या औषधाचे स्वरूप बदलते. ‘पॉलिसिस्टिक ओव्हरिअन डिसिज’, ‘ओव्हरिअन सिस्ट’, ओव्हरिअन सिस्टचाच एक प्रकार असलेले ‘चॉकलेट सिस्ट’, स्त्रीबीजकोषातून स्त्रीबीज न फुटणे, बीजसंख्या अकाली कमी होणे, संप्रेरकांची अनियमितता, स्थौल्य अशा विविध समस्यांवरही बस्ती चिकित्सा करता येऊ शकते.
  • स्त्रीरोगांवर वापरल्या जाणाऱ्या बस्तीचिकित्सेतील ‘उत्तरबस्ती’ हा एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार आहे. यात मूत्रनलिकेमार्गे मूत्राशयात किंवा योनीमार्गे गर्भाशयात र्निजतुक औषधी तेल वा तूप यांचा बस्ती दिला जातो. अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे, बीजवाहिनी नलिका बंद असणे, गर्भाशयात लहान गाठी (फायब्रॉईडस्) होणे, वंध्यत्व अशा तक्रारींमध्ये उत्तरबस्तीचा सल्ला दिला जाऊ शकतो. कोणतीही बस्ती चिकित्सा घेण्यापूर्वी आजाराची तपासणी करून घेणे आणि तज्ज्ञांकडूनच बस्ती उपचार घेणे आवश्यक.
  • ‘पॉलिसिस्टिक ओव्हरिअन डिसिज’, अधिक रक्तस्राव, वंध्यत्व यात ‘वमन’ हे कर्मदेखील उपयुक्त ठरू शकते. वारंवार गर्भपात होत असल्यास ‘वमन’, ‘विरेचन’, ‘रक्तमोक्षण’, ‘उत्तरबस्ती’ व ‘बस्ती’ या कर्माचा उपयोग होऊ शकतो.
  • निरोगी संततीसाठी गर्भधारणेपूर्वी वैद्यांच्या सल्ल्यानुसार पंचकर्माने शरीरशुद्धी करता येते. आयुर्वेदानुसार गरोदरपणी नवव्या महिन्यात औषधी तेलाचा पिचू धारण करणे वैद्यकीय सल्ल्यानुसार तेलाचा बस्ती घेणे हे सुलभ प्रसूतीसाठी मदत करू शकते.
  • वारंवार अंगावर पांढरे जाणे (श्वेतप्रदर) या तक्रारीचे प्रमाणही लक्षणीय आहे. स्थानिक अस्वच्छता, गर्भाशयमुखाची जखम, मेदोविकृती, सतत मूत्रमार्गाचा संसर्ग यामुळे हा त्रास होताना दिसतो. यात जळजळ होणे, कंड सुटणे, पोटदुखी ही लक्षणेही दिसून येतात. अशा तक्रारींमध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधी काढय़ाने स्थानिक प्रक्षालन केल्यास आराम पडू शकतो. गर्भाशयमुखाशी जखम असल्यास जखमेवर र्निजतुक औषधी क्षार लावणे वा र्निजतुक औषधी तेलाचा ‘पिचू’ धारण करणे उपयुक्त ठरू शकते. जाळीदार कापडामध्ये कापसाचा बोळा ठेवून र्निजतुक केलेली पोटली म्हणजे ‘पिचू’.
  • काही महिलांमध्ये पन्नाशीनंतर गर्भाशय खाली आल्यासारखे होते. यातही औषधी तेलाचा पिचू धारण केल्यास त्या ठिकाणच्या आधार देणाऱ्या मांसपेशींना बळ मिळते. काही जणींमध्ये हसल्यावर वा खोकल्यावर आपोआप लघवी होणे, लघवी थांबवता न येणे अशी लक्षणे दिसतात. यामध्ये पिचूसह मूत्रनलिकेद्वारे मूत्राशयात दिल्या जाणाऱ्या उत्तरबस्तीचा उपयोग होतो.
  • मासिक पाळी येणे जितके नैसर्गिक आहे तेवढेच ती जाणे हेही नैसर्गिक आहे. या काळात अनेकदा चिडचिड, औदासीन्य, भीती वाटणे, योनिशुष्कता, कानातून वाफा निघणे, झोप न येणे, अनियमित वा अधिक रक्तस्राव होणे, अशी लक्षणे दिसू शकतात. रजोनिवृत्ती काळातील शारीरिक व मानसिक बदलांवर औषधोपचारांसह शिरोधारा, बस्ती, पिचूधारण, अभ्यंग हे उपचारही उपयुक्त ठरू शकतात.

joshi.rt@gmail.com