News Flash

छातीत कफ

कधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही.

छातीत कफ

कधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही. खोकून खोकून बरगडय़ा-पोटात दुखायला लागते, दम लागतो. यासाठी दररोज सकाळी आंघोळीपूर्वी व रात्री झोपताना छातीला साधे खोबरेल तेल लावून वर हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. त्याने कफ पातळ होऊन लवकर बाहेर पडतो. रात्री आडवे झाल्यावर सतत खोकला येतो, अशा वेळी एक चमचा मध, अर्धा चमचा आल्याचा रस मिश्रण करून तो सावकाश चाटण करावा आणि वर गरम पाणी प्यावे किंवा खोकल्यामुळे दम लागत असेल तर हे चाटण करून वर आल्याचा गरमागरम कोरा चहा प्यावा. खूप फरक पडतो.

अर्धा चमचा भाजून कुटलेली आळशी आणि एक चमचा ज्येष्ठमध पावडर दीड कप पाण्यात उकळवून एक कप काढा शिल्लक ठेवून तो गाळून त्यात चवीपुरती खडीसाखर घालून गरमागरम प्यावे. या उपायानेही कफ चटकन सुटतो. पातेलीत पाणी गरम करीत ठेवावे. त्यावर धातूची चाळण व त्यात आळशीच्या पुरचुंडय़ा ठेवून वाफेने गरम होणाऱ्या पुरचुंडय़ांनी छाती शेकवावी. विशेषत: लहान मुलांना याचा खूप फायदा होतो.

वैद्य राजीव कानिटकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:48 am

Web Title: information on chest cough
Next Stories
1 समुद्रातील निळा रंग दुर्मिळ होणार?
2 व्यायामात हवे सातत्य!
3 दमवणारा सर्दी-खोकला!
Just Now!
X