जगातील सर्वाधिक स्थूल व लठ्ठ नागरिकांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर. जगातील एकूण स्थूल नागरिकांपैकी १५ टक्के भारतात आहेत. अमेरिका या यादीत अव्व्ल, तर चीन दुसऱ्या स्थानावर भारतात पंजाबी नागरिक सर्वाधिक स्थूल आणि वजनदार. पंजाबमधील ३० टक्के पुरुष, तर ३७ टक्के महिला स्थूल. त्रिपुरा व मेघालय या राज्यांमधील नागरिक सर्वाधिक सडपातळ. त्रिपुरातील केवळ ५.३, तर मेघालयातील ८.९ टक्के नागरिकच स्थूल आहेत. पंजाबनंतर केरळ आणि दिल्लीतील नागरिक सर्वाधिक स्थूल. १३ ते १८ वयोगटातील मुले सरासरीपेक्षा जाड. त्यांच्या स्थूलपणाची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत १६ वरून २९ वर गेली. बिहार आणि मेघालयातील महिला या पुरुषांपेक्षा अधिक स्थूल. स्थूलपणाच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक नववा. महाराष्ट्रातील १५.९ टक्के पुरुष आणि १८.१ टक्के महिला स्थूल आहेत. भारतातील २० ते ७९ या वयोगटातील स्थूल व मधुमेहग्रस्त नागरिकांची संख्या २०१३ : ६,५०,००,००० २०१४ : ६,६८,००,००० २०१५ : ६,९१,००,०००