|| डॉ. अद्वैत पाध्ये

‘‘डॉक्टर, तुम्हीच सायकॉलॉजिस्ट ना, मग तुम्हीच का नाही करत समुपदेशन?’’

optical illusion
Optical Illusion : फोटोमध्ये कॅसेट्स दिसताहेत का? पण त्या कॅसेट्स नव्हे! फोटो एकदा नीट क्लिक करून पाहा
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
long distance marriage marathi news, long distance marriage tips
समुपदेशन : ‘लाँग डिस्टन्स’ लग्न टिकतात?

‘‘हे बघा, सगळ्यात पहिले म्हणजे मी सायकॉलॉजिस्ट नाही, मी सायकियाट्रिस्ट. मी एमबीबीएस करून पुढे वैद्यकीय महाविद्यालयात मनोविकारशास्त्रात एम.डी. केले आहे. शिवाय मी समुपदेशन प्रशिक्षण घेतले तर मी औषधोपचार, तसेच इतर भौतिकोपचाराबरोबर समुपदेशन करू शकतो. पण एकूणच लोकसंख्येच्या मानाने मनोविकारतज्ज्ञ कमी असल्याने रुग्णांची ओपीडीतील संख्या खूप असते. त्यामुळे समुपदेशनासाठी तेवढा वेळ देता येत नाही. म्हणून मग ज्यांनी कला शाखेत जाऊन मानसशास्त्र विषयात पदवी व पदव्युत्तर प्रशिक्षण, समुपदेशनाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे प्रशिक्षण घेतलेले असते त्या सायकॉलॉजिस्ट/ मानसशास्त्रज्ञ/ समुपदेशक यांची मदत घेतो. शेवटी आमचे टीमवर्क आहे!’’

‘‘म्हणजे कसे?’’

‘‘तर बघा, की मनोविकार होतात त्यामागे जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि सामजिक कारणांचा अनुबंध असतो. त्यामुळे उपचार करताना या तिन्ही पायांवर आधारित म्हणजे औषधोपचार व इतर भौतिकोपचार, मानसोपचार, पुनर्वसन (सामाजिक, वैयक्तिक), त्यासाठी व्यवसायोपचार, लर्निग डिसॅबिलिटी/ अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी शिक्षणोपचार असं सर्व करावं लागत. मग हे सर्व एकच व्यक्ती कसं करू शकेल? म्हणून मग मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक मानससमाजसेवक, व्यवसायोपचारतज्ज्ञ, शिक्षणोपचारतज्ज्ञ असे सर्वच जण जर एकत्र, एकमेकांबरोबर सांघिक काम करतील तर असलेली समस्या दूर व्हायला नक्की चांगली व लवकर मदत होते, हे नक्की!’’

माझ्या या उत्तराने त्यांचे समाधान झालेले मला दिसले. पण हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. प्रत्येकालाच सर्व उपचारांची गरज असते. काहींना यातील दोहोंची/ तिन्हीची गरज पडू शकते. आता काही जण खूप अशिक्षित असतात किंवा उपचार म्हणजे फक्त औषधेच अशा विचारांचा पगडा त्यांच्यावर असतो. त्याची गरज का आहे असे सांगूनही त्यांची समजून घेण्याची वृत्ती नसते/ स्वभाव नसतो (काही जणांना आर्थिक कारणांमुळे शक्य होत नाही तो भाग निराळा! सवलत देऊन पण).

एकदा तर एका रुग्णाने मला सांगितले, की त्या तुमच्या सहकारी मॅडमचा उपदेश ऐकायला मला पाठवू नका. त्यापेक्षा मी कीर्तनाला/ प्रवचनाला जाईन! त्यांना समजावून पण त्यांचे म्हणणे तसेच होते. मुळातच त्यांचा स्वभाव कोणाचे ऐकून घेण्याचा नव्हता. मी म्हणेन ती पूर्व दिशा असा त्यांचा स्वभाव! मग अशा व्यक्ती समुपदेशनासाठी अयोग्यच ठरतात. त्यामुळे काही वेळा फक्त औषधोपचार (ते पण नियमित घेतले तर) हाच एकमेव पर्याय उरतो! काही वेळा फक्त औषधोपचाराबरोबर, फक्त आजारांची माहिती, कारणे, कुटुंबाने घ्यायच्या काळजीची माहिती औषधोपचारांचे महत्त्व याची माहिती देणारी दोन, तीन सत्रे फक्त करावी लागतात!

मध्यंतरी एका समुपदेशन केद्रांत एका विवाह समुपदेशनासाठी आलेल्या व्यक्तीने त्यांच्या समुपदेशकास विचारले, की तुम्ही स्वत: अविवाहित आहात, मग तुम्ही आम्हास समुपदेशन कसे करू शकता? त्यावर समुपदेशकाने छान उत्तर दिले, ‘‘हे म्हणजे? हृदयविकारतज्ज्ञाने आधी स्वत: हृदयविकाराचा अनुभव घेतला असेल तरच उपचार करावेत, असे म्हणण्यासारखे आहे!’’ कोणत्याही समस्येवर उपाय/ उपचार करतात त्या डॉक्टरने/ समुपदेशकाने त्या समस्येचा अनुभव घेणे गरजेचे नसते. शेवटी त्या समस्येचा अभ्यास, उपचारांबाबतचा अनुभव व कौशल्य महत्त्वाचं आहे. अनेकदा एम.ए. होऊन समुपदेशन करायला सुरुवात करताना त्यांचे वय फक्त २२ ते २३ वर्षे असते. अशा वेळी एवढय़ा छोटय़ा मुली/ मुलगे मला/ आम्हाला शिकवणार असा विचार/ आविर्भाव ठेवणे चुकीचे आहे. शेवटी फक्त एमबीबीएस होऊन डॉक्टर/ वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली तरी वय साधारण तेवढेच असणार असते. प्रत्येक जण पदवी घेऊन नोकरीला लागताना साधारण त्याच वयाचा असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

अनेकदा बराच काळ उपचार व समुपदेशनाची सत्रे चालत असतात, त्यामुळे डॉक्टर वा समुपदेशकाबरोबर रुग्णाचे नाते निर्माण होते. पण बऱ्याचदा ते उपचार करणारा आणि घेणारा या पलीकडे जाऊ  लागते. रुग्ण त्या व्यक्तीवर अवलंबणारा होऊ  लागतो किंवा उपचार करणाऱ्याकडे आपला भाऊ/ बहीण, वडील/ काका अशा नात्याच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो. अशा वेळेला सत्रे लांबवणे/ थांबवणे किंवा समुपदेशक बदलणे असे उपाय करावे लागतात. अर्थात त्यांना तशी कल्पना देऊन.

मनोविकारांवर उपचार करताना मानसोपचाराच्या अन्य पण काही पद्धती आहेत. योग, संमोहन, ट्रांझॅक्शनल अ‍ॅनालिसिस (थॉमस हॅरिस याची), कार्ल रॉजर्सची ‘कलाएंट सेंटर्ड थेरपी’ तसेच फ्रेडरिक पर्ल्सची ‘जेस्टॉल्ट थेरपी’ आर्ट बेस्ड थेरपी, ज्यात म्युझिक थेरपी, डान्स थेरपी हे उपचार पण येतात.

योग ही एक जीवनशैली आहे. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक पातळ्यांवर जर माणूस निरोगी असेल तर तो आरोग्यपूर्ण आहे, असं योग मानतो. माणसाच्या समाधानाचं, सुखाचं मूळ हे माणसाच्या दृष्टिकोनात व आयुष्यातील परिस्थिती व घटना यांच्याकडे तो कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर अवलंबून असतो, असेच योगात सांगितले आहे. त्यामुळे बऱ्याच मनोविकारात, विशेषकरून मनोकायिक विकारात योगाचा खूप छान उपयोग होतो.

अशाप्रकारे मनोविकारावंर अनेक प्रकारची औषधी, विविध सूत्रांवर आधारित मानसोपचारांच्या अनेक पद्धती अवलंबून आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालाप्रमाणे २०२० पर्यंत आणि आसपास जगातील सर्वाधिक मृत्यू हृदयविकार वा कर्करोगापेक्षासुद्धा जास्त मनोविकार/ नैराश्यामुळे होणार आहेत. त्यामुळे मनोविकार आता आपण प्रत्येकाने गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. त्याचा स्वीकार करून तज्ज्ञांची मदत घेऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

मनोविकारांमध्ये औषधोपचार/ भौतिकोपचार आणि मानसोपचार दोन्ही वापरावीत. अमेरिकेत तर मनोविकारांसाठी फक्त मानसोपचार अवलंबून राहील तर त्याविरोधात कडक कायदे केले आहेत.

१९९५ मध्ये के. जेमिसन या मनोरुग्णाने ‘अ‍ॅन अनक्वाएट माइंड’ या आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे, ‘‘थेरपी व औषधी या दोघांचा वापर केल्याशिवाय सामान्य आयुष्य जगणंच अशक्य आहे. लिथियममुळे नैराश्य कमी व्हायला मदत होते. पण मानसोपचारामुळे मनातला गोंधळ कमी होऊन आयुष्याविषयी आशा वाटायला लागते. पण मानसोपचार घेणं औषधोपचारामुळेच शक्य झालं तेही तेवढच खरं आहे!’’

त्यामुळे आपणही सर्वानी मनोविकाराबाबत योग्य तसे उपचार मनापासून घेऊन निरोगी मनाकडे वाटचाल करू या. निरोगी मनामुळे शरीरही निरोगी होईल, पण आध्यात्मिक, वैचारिकदृष्टय़ाही आरोग्यपूर्ण होण्यास मदत होईल.

Adwaitpadhye1972@gmail.com