एखादं काम निघालं की पटकन सायकल काढायची, टांग टाकायची आणि सुसाट निघायचं. पूर्वी एक फ्रेम, दोन चाकं आणि सुस्थितीतले ब्रेक एवढय़ावरच चांगल्या सायकलची व्याख्या संपत असे. परंतु हल्ली सायकलींकडे किंवा सायकलस्वारांकडे पाहिलं की एखादं दुकानच सोबत घेऊन फिरतोय का असं वाटतं. तुमच्या मनातली शंका बरोबर आहे. अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्स – या गोष्टींकडेच माझा रोख आहे. सायकल चालवणं राहिलं बाजूला आणि सायकल व शरीरावर गॅजेट्सची भरमार असं वेगळंच चित्र कधी कधी पाहायला मिळतं. पण सर्वच अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्स बिनकामाची किंवा दिखाव्यासाठीच असतात असं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या सायकलिंगसाठी काही अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्स अत्यावश्यक ठरतात.

परदेशात ज्याप्रमाणे सायकलिंगकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिलं जातं तसं अद्याप भारतात पाहिलं जात नाही. त्यामुळे युरोप किंवा अमेरिकेत मिळणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्सही अतिशय वेगळी आणि तेथील साधनसुविधांसाठी उपयुक्त अशी आहेत. म्हणजेच एका नावाजलेल्या कंपनीचे बाईक रडार जे तुमच्या रिअर लाइटमध्ये (मागचा लाइट इंडिकेटर) असते. त्यामध्ये तुमच्या सायकलच्या मागे किती ट्रॅफीक आहे आणि ते किती वेगाने तुमचा पाठलाग करत आहे याची माहिती सदर कंपनीच्याच सिस्टममध्ये किंवा सायकलच्या हॅन्डलबारवर लावलेल्या युनिटवर तुम्हाला दाखवतं. त्यानुसार तुम्ही कोणता रस्ता घ्यायचा, किती वेगात पुढे जायचं याचा निर्णय घेऊ शकता. परदेशात हे शक्य आहे. कारण तिथे सायकलींसाठी वेगळ्या लेन्स, सिग्नल आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायकलस्वारांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी. आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना अद्याप अवकाश आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

खरं तर सायकलिंगसाठीच्या इतक्या अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्स बाजारात उपलब्ध आहेत, की त्या सर्वाची माहिती इथे करून घेणं शक्य नाही. तरीही काही मोजक्या आणि आवश्यक अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्सची आपण आजच्या आणि पुढील भागात थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. यापकी सर्वच गॅजेट्स तुमच्याकडे असली पाहिजेत असं नाही. पण तुमच्या सायकिलगच्या गरजेनुसार तुम्ही ती विकत घेऊन त्याचा वापर जरूर करू शकता.

  • हेल्मेट : तुमच्याकडे इतर कोणतीही अ‍ॅक्सेसरीज आणि गॅजेट्स नसलं तरी चालेल पण सायकल चालवतानाही स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालणं अतिशय गरजेचं आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपनीची आणि डिझाईनची हेल्मेट उपलब्ध आहेत. परदेशात वापरल्या जाणाऱ्या काही हेल्मेटमध्ये मागच्या बाजूला लाईट इंडिकेटरही आहेत, ज्याचा उपयोग रात्रीच्या वेळी सायकलिंग करताना होऊ शकतो.
  • बॉटल होल्डर : सायकल चालवताना सतत थांबून बॅगेतून पाण्याची बाटली काढणे फारच जिकीरीचं होतं, म्हणून सायकलला बॉटल होल्डर असणं चांगलं. जेणेकरून आवश्यकता भासेल तेव्हा फार वेळ न दवडता तुम्ही पाणी पिऊ शकता. तुमच्या गरजेनुसार सायकलला अनेक ठिकाणी बॉटल होल्डर लावता येतात. फ्रेमवर मधल्या त्रिकोणाच्या तिन्ही आतल्या बाजूने बॉटल होल्डर लावता येतात. तसंच लांब पल्ल्याचं सायकलिंग करताना समोरच्या टायरच्या दांडीला किंवा कॅरियरलासुद्धा बॉटल होल्डर लावण्याची सुविधा असते. रोड सायकलिंग करणारे अनेकदा सीटखाली मागच्या बाजूला हलक्या वजनाचे बॉटल होल्डर लावतात.
  • लॉक : अत्याधुनिक सायकलच्या किमती काही हजारांमध्ये असतात. अशा वेळी सार्वजनिक ठिकाणी सायकल पार्किंग करताना सुरक्षेसाठी तिला लॉक लावणे आवश्यक आहे. बाजारात वायर लॉकपासून इलेक्ट्रॉनिक लॉकपर्यंत सर्व प्रकारचे लॉक उपलब्ध आहेत.
  • स्पीडोमीटर : सायकल किती वेगाने पळते आहे, किती अंतर कापलं जातंय, वेळ, तुमची सर्वोत्कृष्ट कामगिरी हे सारे स्पीडोमीटरमध्ये नोंदवले जाते. स्पीडोमीटर वायरद्वारे पुढच्या चाकाजवळ एका छोटय़ा युनिटशी जोडलेले असते आणि चाकाच्या स्पोक्समध्ये एक छोटेसे ब्लूटूथ युनिट लावलेले असते, त्यामध्ये जमा होणारा डेटा हॅन्डलवरच्या स्क्रीनवर दिसतो.

– प्रशांत ननावरे

prashant.nanaware@expressindia.com

Twitter – @nprashant