समुद्रकिनारे, काजूफेणी, मासे, मद्य यापलीकडेही गोवा पर्यटनाची समृध्द अनुभूती देतो. ती घ्यायची असेल तर या भूमीत दडलेला प्राचीन खजिना आवर्जून पाहायला हवा.

‘‘माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी,

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा
nagpur drug smuggling, drug smuggling uganda via doha marathi news
युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक

पानाफुलांची कुसर पशुपक्ष्यांच्या किनारी’’

कवी बा. भ. बोरकरांनी वर्णन केलेल्या या रम्य गोव्यात निसर्गसौंदर्य ओतप्रोत भरलेले आहे. ते निव्वळ सागरकिनारे आणि काजू-मासे यात दडलेले नसून, चौफेर असलेली गर्द-दाट झाडी, त्यातून वाहणारे निळेशार पाणी आणि साथीला हिरवेगार डोंगर यामध्ये सामावलेले आहे. गोव्यात सुंदर, देखणी आणि प्रसिद्ध मंदिरे तर आहेतच, परंतु तितकीच प्राचीन, पुरातन आणि निसर्गाच्या कुशीत दडलेली तेवढीच सुंदर मंदिरे पाहायला मिळतात. शिवरायांनी जीर्णोद्धार केलेले सप्तकोटेश्वर देवालय जसे रमणीय ठिकाणी वसले आहे तसेच अजून एक सुंदर देवालय गोव्याच्या भूमीत निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. त्याचे नाव तांबडी सुरला. गोव्यामधील सर्वात प्राचीन असे हे मंदिर. मोलेम अभयारण्यात वसलेले, कदंब राजवटीमध्ये बांधलेले हे देखणे देवालय अतिशय सुंदर, निवांत आणि अत्यंत देखणे असे आहे.

इ.स.च्या १० व्या ते १३ व्या शतकात गोव्यामध्ये कदंब राजवटीचे राज्य होते. समृद्ध अशा या कदंब राजवटीचे स्थापत्य आज या मंदिराच्या रूपाने आपल्यासमोर उभे आहे. या मंदिरासंबंधी काही मतांतरेसुद्धा दिसून येतात. काहींच्या मते मंदिर मुख्य वस्तीपासून दूर ऐन जंगलात बांधलेले असल्यामुळे हे जैन मंदिर असावे तर काहींच्या मते हे मंदिर यादव काळात बांधलेले हेमाडपंथी मंदिर असावे. या मंदिरावर चालुक्य-होयसळ स्थापत्याची छाप असल्याचेही काही जणांचे मत आहे. ही मते काही असोत, पण गर्द झाडीत रम्य ठिकाणी वसलेले हे मंदिर यादव-कदंब शैलीतील गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर आहे हे खरे. मुसलमान आणि पोर्तुगीज या दोन्ही राजवटींनी प्राचीन वारसास्थळांचे प्रचंड नुकसान केले. सप्तकोटीश्वर मंदिराची नासधूस आणि तिथल्या शिविपडीची अवहेलना हे या अत्याचारांचे गोव्यातले ज्वलंत उदाहरण. छत्रपती शिवरायांमुळे सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार तरी झाला, परंतु गोव्यात अशी अनेक मंदिरे नष्ट केली गेल्यामुळे त्यांचे अस्तित्वच नाहीसे झाले. पण, तांबडी सुरला मंदिराचे नशीब हेच की, पोर्तुगीजांच्या अनन्वित छळवणुकीतून हे देवालय वाचले हे खरेतर भाग्यच म्हणावे लागेल. पणजी-फोंडा-धारबांदोडामाग्रे तांबडी सुरला हे अंतर ७५ किमी इतके भरते. हा सगळाच रस्ता हिरव्यागार झाडांच्या कमानीमधून जात असतो. गोव्यातून देशावर जाण्यासाठी विविध घाटमार्ग आहेत. त्यातल्या कर्नाटकात जाणाऱ्या अनमोड घाटाच्या पायथ्याशी हे नितांतसुंदर मंदिर वसलेले आहे. सह्यद्रीच्या अगदी पायथ्याशी हे मंदिर असल्यामुळे सह्यद्रीने याला कवेत घेतल्यासारखे जाणवते. बाजूने वाहणारा बारमाही ओढा, याला स्थानिक भाषेत ‘वझर सकळाचो वहाळ’ असं म्हणतात. सर्वत्र हिरवीगार झाडी आणि पूर्वेकडे पहाडासारखा उभा असलेला सह्यद्री अशा सगळ्या निसर्गचित्रात हे काळ्या पाषाणातील मंदिर ठसठशीतपणे उठून दिसते. क्लोराइड शिष्ट जातीच्या दगडात बांधलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला गर्भगृह, अंतराळ आणि मुखमंडप अशी रचना आहे. मुखमंडपात मूíतकाम केलेले दगडी चार खांब पाहायला मिळतात. या मुखमंडपाला तीन बाजूंनी प्रवेश करता येतो. मुखमंडपात गोल रंगशिळा असून सध्या त्यावर नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. मुखमंडपाच्या चार खांबांपकी एका खांबावर हत्तीच्या पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या घोडय़ाचे शिल्प पाहायला मिळते. हे शिल्प कदंब राजवटीचे राजचिन्ह समजले जाते. या मुखमंडपात अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे असलेले दगडी झुंबर. मुखमंडपाच्या छतावर अतिशय सुंदर दगडी झुंबर कोरलेले दिसते. कमळाचे उमललेले फूलच जणूकाही दगडातून कोरून काढलेले आहे. त्याच्या चारही बाजूंनी सुशोभीकरणासाठी कीíतमुखेसुद्धा कोरलेली आहेत. मुखमंडपात तीन बाजूंना बसण्यासाठी कक्षासने केलेली आहेत.

गर्भगृहाच्या दाराशी असलेली जाळीची नक्षी होयसळ स्थापत्यशैलीची आठवण करून देते. गर्भगृहात एका दगडी चौथऱ्यावर शिविपड पाहायला मिळते. मंदिराच्या बाह्यभागावर मूíतकाम नाही. परंतु, खास कदंब नागर शैलीमधे बांधलेल्या मंदिराच्या शिखरावर पश्चिमेला नृत्यशिव आणि पार्वती, उत्तरेला गणपतीसह गजलक्ष्मी, दक्षिणेला भरव आणि ब्रह्मा तर पूर्वेला लक्ष्मी नारायण ही शिल्पे आवर्जून पाहण्यासारखी आहेत. मंदिराच्या चहुबाजूंनी सुंदर हिरवळ आहे.  इ.स.च्या १३ व्या शतकात बांधलेल्या या कदंब शैलीतील मंदिराची तुलना धारवाड जिल्ह्यातल्या कल्लेश्वर किंवा बेळगाव जिल्ह्यतील जैन मंदिरांशी केली जाते. कर्नाटक राज्याच्या सीमेला लागूनच हा परिसर असल्यामुळे कर्नाटकातील मंदिरांच्या स्थापत्याची छाप या मंदिरावर पडणे स्वाभाविक आहे. महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते. परंतु, हे मंदिर आणि याच्या परिसराचे निसर्गसौंदर्य पाहायचे असेल तर शक्यतो श्रावण महिन्यात किंवा पावसाळा संपताना इथे यावे. सगळा परिसर हिरवागार असताना काळ्या पाषाणातील मंदिर अतिशय सुंदर दिसते. बाजूच्या डोंगरांवरून कोसळणारे धबधबे आणि आजूबाजूची हिरवी वनश्री बघून इथून निघावेसे वाटतच नाही. गोव्याच्या समृद्ध आणि निसर्गसंपन्न भटकंतीमधे जरा वाट वाकडी करून या ठिकाणी आवर्जून यावे आणि तांबडी सुरला महादेव मंदिर आणि इथला शांत रमणीय परिसर याचा अनुभव पर्यटकांनी अवश्य घ्यायला हवा.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com