मुंबईकरांना उडुपी माहिती आहे ते मुंबईतल्या उडुपी हॉटेल्समुळे आणि उडुपीतल्या प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरामुळे. या उडुपीला सुंदर समुद्रकिनारा आहे त्याचं नाव आहे मालपे बीच. या बीचपासून समुद्रात सहा किलोमीटर अंतरावर निसर्गातील एका आश्चर्याने समुद्रातून डोकं वर काढलेलं आहे. ते म्हणजे सेंट मेरीज आयलॅण्ड. पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्टकोनी अशा उभ्या बेसॉल्ट खडकाच्या स्तंभांनी ही चार बेटं बनलेली आहेत. भारतातली अशा प्रकारची ही एकमेव बेटं असून, जिओग्राफिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने २००१ मध्ये या बेटांना ‘नॅशनल जिओग्राफिक मॉन्युमेंट’चा दर्जा दिलेला आहे.

उडुपी बस स्थानकापासून पाच किमीवर जेटी आहे. सेंट मेरीज आयलॅण्डला जाण्यासाठी येथून बोटी सुटतात. बोटीचे तिकीट १०० रुपये असून ३० लोक जमा झाल्याशिवाय बोट सोडत नाहीत. त्यामुळे शक्यतो सुट्टीचा दिवस आणि संध्याकाळी चारच्या दरम्यान जावे म्हणजे सूर्यास्त पाहून परतता येते. बेटावर वस्ती नसल्याने खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळत नाहीत. त्यामुळे त्या सोबत बाळगाव्यात. धक्क्यावरून साधारण अध्र्या तासात आपण सेंट मेरीज आयलॅण्डपाशी पोहोचतो. स्थानिक दंतकथेप्रमाणे केरळला जाण्यापूर्वी १४९८ मध्ये वास्को द गामा प्रथम या बेटांवर आला आणि मदर मेरीच्या नावावरून त्याने या बेटाला सेंट मेरी आयलॅण्ड असे नाव दिले. या ठिकाणी  कोकनट आयलॅण्ड (या बेटावर नारळाची झाडं आहेत.), नॉर्थ आयलॅण्ड, दर्या बहादूरगड आयलॅण्ड आणि साउथ आयलॅण्ड या चार मोठय़ा बेटांनी समुद्रातून डोके वर काढलेले आहे. यातील कोकनट आयलॅण्ड म्हणजेच (सेंट मेरीज आयलॅण्ड) वर बॅसॉल्ट खडकाचे बहुकोनी स्तंभ आहेत.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
pimpri chinchwad ev marathi news
पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच!
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

बेटाजवळ बोट आल्यावर दुरूनच बेटावर आणि समुद्रात आजूबाजूला विखुरलेले बेसॉल्टचे स्तंभ दिसायला लागतात. बेट २४ एकरांवर पसरलेले आहे. बेटावर काही माडाची झाडं आणि खुरटी झुडपं पाहायला मिळतात. बेटावरची जमीन वाळूने बनलेली नसून शंख-शिंपल्यांनी बनलेली आहे. बेटावर अगणित शंख-िशपले पाहायला मिळतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शंख- शिंपले इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतात. या बेटाला वाळूचा किनारा नसून या शंख- शिंपल्यांनी बनलेला किनारा आहे. बेटाच्या आजूबाजूला खडक असल्याने समुद्रही पोहण्यालायक नाहीये. बेटावर फिरताना वरून पाहिले तर कासवाच्या पाठीसारखे आणि बाजूने पाहिले तर खांबांसारखे दिसणारे बेसॉल्टचे दगडी स्तंभ दिसायला लागतात. लाव्हारसामुळे दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली त्याच वेळी या बेटाची आणि त्यावरील स्तंभांची निर्मिती झाली. या स्तंभांसारख्या रचनेला ‘कॉलम्नर जॉइंट’ म्हणतात. पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्टकोनी अशा बहुकोनी आकारात तयार झालेले हे स्तंभ एकमेकाला चिकटलेले असतात. लाटांच्या आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळे अनेक स्तंभ तुटून पडलेले पाहायला मिळतात. बेटावर काही सेंटीमीटर उंच ते जास्तीतजास्त १० मीटर उंचीचे स्तंभ पाहायला मिळतात. दगडी स्तंभांचे विविध आकार, त्यावर  आदळणाऱ्या लाटा आणि विविध आकाराचे, रंगांचे शंख-शिंपले गोळा करताना वेळ कसा जातो ते कळत नाही. बोटीचा परतीचा इशारा देणारा भोंगा वाजायला लागतो.  जणुकाही समुद्रात बुडत्या सूर्याला साक्षीला ठेवून आपण या सुंदर बेटाचा निरोप घेतो.

कसे जाल?

कर्नाटकातील उडुपी स्थानक

कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक आहे. या ठिकाणी सर्व गाडय़ा थांबतात. रेल्वे स्थानकावर उतरून तेथे जाण्यासाठी वाहने उपलब आहेत. उडुपीत राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आहेत. कोस्टल कर्नाटक सहलीत वाट थोडी वाकडी करून आपण उडुपी आणि सेंट मेरी आयलॅण्डचा समावेश करू शकतो.

अमित सामंत amitssam9@gmail.com