ठाणे शहराजवळ एक सुंदर कोरीव लेणी आहे ती म्हणजे लोनाडची लेणी. भिवंडीहून सोनवलीमाग्रे एक रस्ता पाच किलोमीटरवरील चौधरपाडय़ावरून पुढे जातो. इथेच डाव्या हाताच्या टेकडीवर खोदलेला तीन लेण्यांचा समूह आहे. टेकडीच्या पूर्व उतारावर ही लेणी आहेत. यातील मुख्य चत्य लेणे २१ मीटर लांबीचे असून त्याच्या डाव्या हाताला काहीसे खाली एक उत्तम जलाशय आहे. इथे या लेणीकडे तोंड करून उभे राहिले की, उजव्या हाताच्या िभतीवर एक सुंदर प्रसंग कोरलेला आहे. एका राजाने आपला डावा पाय आसनाखाली सोडलेला आहे तर उजवा पाय वर उचलून दुमडून घेतलेला आहे. राजाचा डावा हात वरद मुद्रेत आहे. राजाच्या मागे चामर, तलवार, जलकुंभ, इत्यादी घेतलेले सेवक-सेविका कोरलेले आहेत. हे चित्र इ.स.च्या सहाव्या शतकात कोरलेले असावे, असे तज्ज्ञ सांगतात.
कल्याणहून ही लोनाडची खांडेश्वरी लेणी अध्र्या दिवसात सहज पाहून येण्याजोगी आहे. इथेच जवळ चौधरपाडा या गावात एक असेच जुने मंदिर असून त्या मंदिराचे स्थापत्य आणि त्यावरील शिल्पकाम आजही थक्क करते. इथेच जवळ शेतात पडलेला अंदाजे सहा फूट उंचीचा गद्धेगाळ आणि त्यावरील शिलालेख मुद्दाम पाहण्याजोगे आहेत. गद्धेगाळ म्हणजे एखाद्या मंदिराला राजाने दिलेले दानपत्र. ज्यामध्ये काही गावे अथवा काही जमीन त्या मंदिराला दान दिलेली असते आणि त्या दानाचा जो कोणी अव्हेर करील त्याच्याबद्दल शापवाणी उच्चारलेली असते. ज्याला कोणाला वाचता येणार नाही त्यासाठी ही शापवाणी चित्राद्वारे दाखवलेली असते. त्यावर खूप मोठा शिलालेख कोरलेला दिसतो. परंतु तो आता खूपच अस्पष्ट झालेला आहे.
इथेच शेतात पुढे एक छोटेसे मंदिर असून त्या मंदिरामध्ये शिवपार्वतीची आिलगन मुद्रेतील अत्यंत देखणी प्रतिमा पाहायला मिळते. अतिशय शांत व निसर्गरम्य परिसर असूनही पर्यटकच काय सामान्य लोकांचीही तिथे अजिबात वर्दळ दिसत नाही.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Lonad khandeshwari cave
First published on: 06-04-2016 at 01:32 IST