News Flash

अशा वाहिन्यांची कोर्टाने स्वत:हून दखल घ्यावी

‘‘भारतापासून काश्मीर तोडण्याच्या पाकिस्तानी कारवायांना यश मिळणार नाही’

‘स्टुडिओ आणि रस्त्याच्या मध्ये’ हा शाह फैजल यांचा लेख (रविवार विशेष, २४ जुल ) स्टुडिओ आणि फेसबुकवरील ‘रम्य कथा’ चविष्टपणे बघणाऱ्यांना तेथील मायावी दुनियेतून रस्त्यावर आणेल, ‘को वादिस’ची जाणीव आणि ‘शुभास्ते पन्थान’चा संदेश देईल अशी आशा आहे.

‘झी न्यूजवरील दोन दिवस सलग लांबलचक चच्रेत मृत दहशतवाद्यांबरोबर लेखकाच्या छायाचित्रांची सरमिसळ करून दाखवली जाणे, त्यांच्या फेसबुक वॉलवरील गलिच्छ भाषेतील कॉमेंट्स होणे, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील व्यापारी व्यूहनीतीचा एक भाग म्हणून काश्मीरविषयी खोटय़ा गोष्टी पसरवून विपर्यस्त चित्रण गेली काही वष्रे करीत राहणे, काश्मिरी अभिमानाच्या प्रतीकांचा अवमान करणे, लष्करी शौर्याला नागरी यातनांपेक्षा अधिक वरचढ दाखविणे, राज्य सरकारच्या सकारात्मक उपक्रमांकडे दुर्लक्ष करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा काश्मिरी नागरिकांपेक्षा गाईंना अधिक महत्त्व असल्याचे दाखविले जाणे.. आपल्या राष्ट्रीय (?) टीव्ही वाहिन्यांवरील प्राइम टाइममधील आक्रस्ताळ्या प्रसारणाबरोबर काश्मीर एकेक मल भारताच्या पश्चिमेकडील दिशेने ढकलून देणे ..’ हे फारच चिंताजनक आहे.

‘झी न्यूज, टाइम्स नाऊ, न्यूजएक्स आणि आज तक हे या भारताच्या संवादावर आधारित संस्कृतीकडून मूर्ख आणि अताíकक संस्कृतीकडे’ नेणाऱ्या माध्यमांनी केलेल्या प्रकारांची प्रेस कॉन्सिलसारख्या संस्थांनी तर कारवाई करावीच, पण भिन्न धर्म, निवास, प्रांत असलेल्या गटांमध्ये तेढ पसरवून समाजातील एकोप्याला धोका पोहोचविल्याचे भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ खाली गुन्हे घडल्याच्या शक्यतेमुळे न्यायालयांनी स्वत:हून दखल घ्यावी.  ‘‘भारतापासून काश्मीर तोडण्याच्या पाकिस्तानी कारवायांना यश मिळणार नाही’’ हा सुषमा स्वराज यांचा विश्वास सार्थ असेल, पण टीआरपीने नियंत्रित प्रसारमाध्यमे सुषमा स्वराज यांचे मनसुबे उद्ध्वस्त करीत आहेत याकडे राजकीय पक्ष कानाडोळाच करतील. माध्यमसम्राट सुभाष चंद्र यांना भाजप पािठबा देते आणि काँग्रेस नेते निष्ठेने, सामूहिकतेने आणि एकदिलाने चुका करून राज्यसभेवरील त्यांची निवड सोपी करतात ते बघितले की भाजप-काँग्रेसच्या ‘देश’हित शब्दातील ‘देश’ शब्दाची व्याख्या किंवा भारत कधी-कधी माझा देश आहे’ ही वृत्ती उघड होते.

सर्वसमावेशक सामाजिक विकास याच्या चर्चेला बगल देण्यासाठी देशभक्ती, राष्ट्रप्रेम अशा भावनांनी ओथंबलेल्या आणि उच्चरवाने, तारसप्तकात केलेल्या चर्चाबरोबर समाजाने फरफटत जाणे इष्ट नाही.

 – राजीव जोशी, बंगळुरू

 

देशोदेशींच्या नेत्यांची तऱ्हा

‘अध्यक्षीय उमेदवाराचा सोहळा’ हा गोविंद तळवलकर यांचा लेख (रविवार विशेष, २४ जुल) मधील वाचून आपल्या आणि त्यांच्या राज्यकर्त्यांची तुलना मनात येतेच. अध्यक्षाला खऱ्याखुऱ्या सेनापतीचे वलय बहाल करणारे अमेरिकेतील नागरिक आणि ते वलय लीलया ल्यालेले तेथील नेते आपल्याकडील नावातच ‘सेना’ असणाऱ्या अनेक पक्षांची आठवण करून देतात. ट्रम्प यांची मुस्लीमविरोधी प्रतिमा पुसण्याकरता एक मुस्लीम नागरिक व्यासपीठावर येतो आणि सद्भावना कशा उतू जातात हे वाचून आपल्या इफ्तार पाटर्य़ा, एखाद्या गरीब दलिताच्या झोपडीत एखाद्याने केलेले भोजन / वास्तव्य आठवते. सध्याच्या आíथक संकटांना ओबामा आणि हिलरी िक्लटनच कसे जबाबदार आहेत हे मांडण्याचा प्रयत्न हे आपल्याकडील निवडणुकीतील भाषणाचेच तंतोतंत वृत्तांकन वाटते. जगभर वाढणाऱ्या दहशतवादी संघटनांकरता रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट्सना जबाबदार धरणे म्हणजे यंदाच्या दुष्काळाची जबाबदारी काँग्रेस-राष्ट्रवादीने सध्याच्या सरकारच्या माथी मारण्यासारखे वाटते.

नियम सिद्ध करणारा अपवाद एकच. तो म्हणजे तुलनेने सशक्त अशी कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांचा प्रचंड गोतावळा असूनही नेत्याचे नातेवाइक व्यासपीठावर येऊन आपले वडील, पती, बंधूच कसे लायक उमेदवार आहेत याची जाहिरात आपल्याकडे अजून करत नाहीत. परंतु अतिशय व्यक्तिकेंद्रित अमेरिकन समाजात (कदाचित त्याच कारणामुळे असावे) अशा जाहिरातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक पक्ष सोडून दुसऱ्या टोकाच्या विचारसरणीच्या पक्षात जाऊन आपले नेते किती सहजपणे स्थिरावतात ते पाहिले, आणि देशोदेशींच्या नेत्यांची वरील तऱ्हा पाहिली की कुठल्याही देशाचे राज्यकत्रे कुठल्याही दुसऱ्या देशाची सत्ता सहज राबवू शकतील असे वाटते.

विनिता दीक्षित, ठाणे

 

लाटेतवाहून जाण्याचा उपाय

ते ‘लाट’कर हे संपादकीय (२३ जुलै)अस्वस्थ करणारे आहे. काही विशिष्ट प्रकारचे किंवा विशिष्ट अभिनेत्यांचे चित्रपट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट अथवा फुटबॉल स्पर्धा यांच्या लाटा मधून मधून येत असतात, पण त्या तात्कालिक असतात. बहुतेक चित्रपट तर लवकरच विस्मृतीत जातात. परंतु खरी चिंता आहे ती मोबाइल गेम्सची. व्हिडीओ गेम्स झाले, संगणकावरील गेम्सपण झाले. परंतु मोबाइलवरील गेम्सचे वेड आबालवृद्ध सर्वानाच लागले आहे. त्यातूनही हातात मावणाऱ्या या डबीशी काहींना काही चाळा केल्याखेरीज तरुण मुलामुलींना राहवतच नाही. सतत गेम्स खेळल्यामुळे हातांच्या नसांवर येणारा ताण, भिरभिरणारे डोके, यांचा अनुभव मीही घेतला आहे, आणि ही सवय प्रयत्नपूर्वक दूर सारली आहे.

मग असा विचार मनात येतो की, लयाला गेलेली एकत्र कुटुंब पद्धती, एकच मुलगी अथवा मुलगा असणारे छोटे कुटुंब, फ्लॅट संस्कृतीतील बंदिस्त वातावरण, त्यामुळे येणारा एकाकीपणा, या सर्वाचा हा एकत्रित परिणाम आहे का? अशा वेळी मी ज्या चाळीत राहतो, तेथील वातावरण डोळ्यांसमोर येते. नोकरी, शाळा वगरे निमित्ताने दिवसभर शांत असलेली चाळ संध्याकाळी मात्र जिवंत होते. चाळीतील वेगवेगळ्या वयोगटातील मुलामुलींची संख्या मोठी आहे. त्यांची दंगामस्ती, आरडाओरडा हवाहवासा वाटतो. चाळीच्या प्रशस्त चौकात चालू झालेले त्यांचे वेगवेगळे खेळ मनाला प्रसन्न करतात; आणि वाटते की कोणत्याही ‘लाटेत’ वाहून न जाण्याचा हा एक उपाय आहे.

अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)

 

हे प्रकार काळजी वाढवणारे

‘ ते ‘लाट’कर !’ हे संपादकीय (२३ जुलै) लाटेत वाहवत जाणाऱ्या समाजावर योग्य टिप्पणी करते. चित्रपट असो वा राजकारण एखादी लाट संबंधितांना कायमच उपयोगी पडत आली आहे. खेळांच्या बाबतीतही तेच आहे. पूर्वी स्नूकर आणि बोलिंग अ‍ॅलीने सर्वाना वेड लावले होते. नंतर व्हिडीओ गेम्स आणि प्लेस्टेशनचा जमाना आला. आता पोकॅमॉन आहे. पण या सर्वामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्यांचे जे फॅन्सपुराण आहे ते न भूतो न भविष्यति असे आहे. कारण पन्नास फुटी कटआउटला दुधाचा अभिषेक, यज्ञयाग हे सर्व कुठे तरी न पटणारे असेच आहे. पूर्वी फक्त दक्षिणेपुरतेच मर्यादित असलेले हे प्रकार भारतभर आणि भारताबाहेर होणे हे काळजीचेच कारण आहे. चित्रपट अभिनेत्यावरचे एवढे टोकाचे प्रेम जर एखाद्या विधायक कार्याबद्दल असले तर निदान समाजाचा फायदा तरी होईल. पण या अतिरेकी प्रेमाचे मार्केटिंग करणाऱ्यांचे काय होणार?

माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

 धार्मिक सहिष्णुता जपणारी अतूट मत्री

६ डसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीची वास्तू कारसेवकांनी पाडली. तरीही रामकेवल दास, रामचंद्र परमहंस आणि हशिम अन्सारी यांची मत्री अतूट राहिली. फैजाबाद शहरात अन्सारींचे निधन झाले. त्यांना जी खंत होती ती महत्त्वाची वाटते. अन्सारी म्हणायचे, ‘‘तत्त्वासाठी हा कायदेशीर लढा आहे, श्रीराम जन्मभूमीवादाबाबत सन्मान्य तोडगा असावा, ७० एकर जागेवर श्रीराममंदिर व मशीद बांधावी आणि दोन्हीमध्ये १०० फूट उंचीची िभत बांधावी. श्रीरामाच्या नावाने आंदोलनकत्रे महालात राहतात आणि श्रीराम मात्र थंडी वाऱ्याच्या राहुटीतच!’’ ही त्यांची खंत एखाद्या आदर्श तत्त्वनिष्ठेला लाजविणारी वाटते. असे हे धार्मिक सहिष्णुता जपणारे कोणत्याही धर्माचे धर्मनिष्ठ असतील तरच राममंदिर लवकर होईल, नुसत्या कामापुरत्या वल्गना कामाच्या नाहीत.

अमोल करकरे, पनवेल

 

 हेल्मेट सक्ती करता, पण रस्त्यांकडेही बघा की!

महाराष्ट्राचे मंत्री जाहीर करते झाले, डोक्यावर हेल्मेट असेल तरच पंपावर पेट्रोल देण्यात यावे. जबाबदार मंत्री असे तिरपागडे निर्णय जाहीर करतात आणि जनतेची करमणूक होते. इतिहासात राजधानीचे शहर सहजपणे बदलल्याचे शेख महंमदी वागणे वाचले होते तसाच हा प्रकार. मुळात हेल्मेट नसण्यामुळे अपघात होतात का हा विचार कोणीच करताना दिसत नाही. भारतातल्या कुठल्याही शहरातील रस्त्यांची भयानक अवस्था मंत्र्यांना दिसत नाही का? अपघातांची मूळ कारणे न बघता रोग एकाला आणि औषध तिसऱ्याला असला हा निर्णय अचाट आणि तद्दन मूर्खपणाचाच आहे. सरकारने आणि कोर्टानेसुद्धा हेल्मेटचे आदर्श वजन, त्याच्यामुळे होणारी दृश्यमानतेची कमी, मानेच्या मणक्यांना होणारी हानी अशा तांत्रिक बाबीविषयी तज्ज्ञांकरवी सांगोपाग अभ्यास करून निर्णय घेणे अपेक्षित आहे.

प्रकाश बिद्री

 

हेल्मेट असूनही बळी जातात

विधानसभेत परिवहनमंत्र्यांनी घोषणा केली की हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. निर्णय म्हणून ठीक आहे, पण  पुण्यात अलीकडेच एका महिलेचा हेल्मेट असूनही बळी गेला.  त्याची जबाबदारी कोणत्या रस्ते दोषावर निश्चित करण्यात आली? मंत्र्यांनी घोषणा कराव्यातच, पण  मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीची जाणीव ठेवून निर्णयाची अंमलबजावणी करायला हरकत नाही.

भाऊसाहेब दहिफळे, अहमदनगर

 

हे आश्चर्य नव्हे काय?

सगळ्याच पक्षात पक्षांतर्गत संवादाचा अभाव ( ूे४ल्ल्रूं३्रल्ल  ॠंस्र् ) हा गेल्या काही दिवसांतल्या राजकीय बातम्यांतील सारांश म्हणता येईल. अगदी जवळचे आणि ताजे उदाहरण म्हणजे शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी डॉ. आंबेडकर भवन पाडण्याबाबत केलेले जाहीर निवेदन पाहा. एरव्ही एकमुखी असलेल्या पक्षात असे होऊ शकेल हे पटणे जरा कठीण वाटते. मोबाइल, संगणक व ई-मेलच्या सध्याच्या काळात संवादाच्या साधनांचा सुकाळ असूनही संवाद मात्र नसावा हे आश्चर्य नव्हे काय?

–  गजानन गुर्जर पाध्ये, दहिसर (मुंबई)

loksatta@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 3:37 am

Web Title: loksatta readers opinions 5
Next Stories
1 लोकप्रतिनिधींची (हीन) मानसिकता
2 ‘विरुद्ध सेक्युलॅरिझम’चे आधार न पटणारे
3 बघ्याची भूमिका सोडायला हवी
Just Now!
X