चित्र हे पाहणाऱ्याच्या मनात असते असे म्हणतात. मग कदाचित इतर कुणाला तरी त्यात आणखीनच वेगळे काही भासते का? आणि चित्रकार ते साकारतो तेव्हा त्य़ाला स्वतला नेमके काय वाटत असते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेची खिडकी, आतमध्ये या खिडकीला टेकून एक जण निद्राधीन झालेला, दुसरी व्यक्ती बाहेर पाहतेय, पलीकडच्या बाकावर खिडकीकडे तोंड करून बसलेली महिला आणि खिडकीच्या गजांबाहेर  तुलनेने तरुण दिसणारा चेहरा; तो दरवाजाच्या फूटबोर्डवर उभा राहून प्रवास करणाऱ्या मुलाचा असावा. शहरी जीवनाचे हे असे अनोखे पदर असलेले चित्र पाहिल्यानंतर आपल्याला ‘बाहेरचे आणि आतले’ हा ललितनिबंध आठवतो. बाहेर असलेल्यांना सतत वाटत असते की, आतील सारे सुखी आहेत आणि ‘बाहेरचे’ सारे आतमध्ये त्या रेल्वे डब्यात शिरण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आतमध्ये शिरले, स्थिरावले की, तेही ‘आतले’ होतात आणि मग बाहेरून आत ढकलणाऱ्यांच्या, शिरणाऱ्यांच्या विरोधात पुढच्या स्टेशनवर बोलू लागतात. दोन वेगळी जगं, त्यांना त्यांचे वेगळेपणही आहे आणि त्यांना जोडणारा एक दुवाही आहे. शहरी आयुष्याचं हे अनोखेपण त्या ललित निबंधाप्रमाणेच प्रसिद्ध चित्रकार गीव्ह पटेल यांच्या या चित्रामध्येही येतं.

मराठीतील सर्व अरुपाचे रुप बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gieve patel
First published on: 10-02-2017 at 01:05 IST