शिशिरातली पानगळ संपायला लागली की निसर्गाला वेध लागतात ते प्रेमोत्सवाचे. अंगावर लाल लेणं मिरवणारा पांगारा आणि प्रेमाचा आदर्श असलेला सारस पक्षी या उत्सवाचेच प्रतीक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच केलेल्या जंगल निसर्ग भ्रमंतीनंतर सहजच इंदिरा संतांची पानगळ कविता आठवली. किती सहजसुंदरपणे इंदिराबाईंनी जात्या शिशिराचं वर्णन केलंय. ‘आला शिशीर संपत पानगळ सरली, ऋतुराजाची चाहुल झाडावेलींना लागली..’. अगदी खरंय. जागोजागी करडय़ा शुष्क रंगाची जाणीव तीव्र होत असतानाच काटेसावर आणि पळसाने उधळलेला लाल रंग निसर्गात येऊ घातलेल्या प्रेमोत्सवाचेच प्रतीक वाटावं. जसे आपले न्यू इयर सेलिब्रेशन्सचे फंडे बहुचर्चित असतात, तसेच फेब्रुवारीतल्या सेंट व्हॅलेंटाईन डे या प्रेमदिवसाचे फंडे बहुचर्चित असतात. आपल्याकडे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा जणू प्रेममय होऊन गेलेला असतो. निसर्गातसुद्धा येऊ घातलेल्या वसंताची चाहूल लागलेली असतेच. लाल काटेसावर नि गुलाबी कांचन पूर्ण फुलून जणू काही वसंताच्या आगमनाला तयारच असतात.

मराठीतील सर्व आसमंतातून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pangara tree and saras bird
First published on: 12-02-2016 at 01:27 IST