08 December 2019

News Flash

चित्र

भारतीय लघुचित्र शैलीच्या वैशिष्टय़ांचा वापर करत स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित करणारे चित्रकार म्हणजे जगन्नाथ मुरलीधर अहिवासी.

| June 13, 2014 01:02 am

भारतीय लघुचित्र शैलीच्या वैशिष्टय़ांचा वापर करत स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित करणारे चित्रकार म्हणजे जगन्नाथ मुरलीधर अहिवासी. ‘जेजे’चे विद्यार्थी असलेल्या अहिवासी यांना १९२७ साली मानाच्या मेयो पदकाने गौरविण्यात आले होते. भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीमध्येही अहिवासी वेगळे ठरले. ते अपारदर्शक जलरंगांचा वापर त्यांच्या चित्रांमध्ये करत. युनेस्कोच्या जागतिक प्रदर्शनात अहिवासींच्या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला. ते चित्र एवढे छान होते की, चीन सरकारनेही त्यांच्याकडून त्या चित्राची प्रतिकृती साकारून घेतली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातर्फे येत्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या ‘प्रवाह’ या प्रदर्शनामध्ये त्यांची चित्रे प्रत्यक्ष पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

First Published on June 13, 2014 1:02 am

Web Title: chitra 4
टॅग Art,Chitra 2,Drawing
Just Now!
X