एकदा एक आलिशान क्रूझ (जहाज) वादळात सापडते व लाटांच्या तडाख्याने उलटे होते. त्यामुळे क्रूझवर प्रवास करणारे अनेक धनाढय़ प्रवासी, समुद्रामध्ये गटांगळ्या खाऊ  लागतात. त्यातील एक धनाढय़ उद्योगपती, अर्धमेल्या स्थितीमध्ये एका निर्जन बेटाच्या किनाऱ्यावर वाहून येतो. त्या बेटावर घायपाताचे जंगल, केळीची व नारळाची झाडे, काटेरी निवडुंग यांचेच साम्राज्य दूरवर पसरलेले असते. विषारी सापांचे वास्तव्य असलेले बांबूचे बन व अणकुचीदार खडकांचे कातळदेखील त्या बेटाला अधिकच भयावह बनवत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलोपार्जित संपत्तीमुळे धनाढय़ झालेल्या त्या माणसाचे आयुष्य, वादळाच्या एका तडाख्यामुळे, एका क्षणात भकास व आव्हानात्मक झालेले असते. भूक लागल्यावर तो धनाढय़ माणूस केळी तोडून भूक भागवायचा, तर नारळ फोडून पाण्याची तहान भागवायचा, सापांच्या भीतीमुळे व अणकुचीदार कातळामुळे पावले सोलवटून रक्तबंबाळ होतील या भीतीमुळे तो वाळूचा किनारा सोडून कुठेच भटकायचं नाही. दिवसा झोप आली की किनाऱ्यावरच तो निळ्या आकाशाखाली झोपायचा व रात्री चांदण्या मोजत जागायचा. जागा असताना समुद्रामध्ये कोणते जहाज दिसते का किंवा आकाशात विमान दिसते आहे का ते शोधायचा. हेतू हाच की इशारे करून कोणाच्या तरी नजरेस तो पडावा व त्याची तिथून सुटका व्हावी.

मराठीतील सर्व कॉर्पोरेट कथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad patch in career
First published on: 13-05-2016 at 01:12 IST