आज खूप दिवसांनी गोडांबेबाईंचे जुने विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांच्या घरी चहापाण्याला जमले होते. बाईंनी स्वत:च्या हातांनी गरमागरम कांदे पोहे व वाफाळलेला चहा बनविला होता. विद्यार्थी जरा जास्त असल्याने बाईंची कपबश्या जमविताना धांदल उडत होती. घरात होत्या-नव्हत्या, तेवढय़ा सर्व कपबश्या ओटय़ावर आल्या होत्या. काही कप चिनीमातीचे होते तर काही प्लास्टिकचे. काही नक्षीदार, सुडौल आकाराचे होते तर काही स्टीलचे उभट! बाईंच्या विद्यार्थिनींनी, सर्व कपांमध्ये जायफळ व वेलचीयुक्त चहा ओतला. दोन ट्रेमध्ये सर्व कप विराजमान झाले. काही कप बश्यांसोबत होते तर काही कप नुसतेच होते. एखाददुसऱ्या कपाचा कानही तुटला होता. दोन्ही ट्रे मुलांच्या समोर ठेवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनुष्यस्वभावाप्रमाणे नक्षीदार कप व सोबत तशीच सुंदर बशी असलेल्या चहावर सलीलने सर्वप्रथम डल्ला मारला. चिनीमातीचे कप हे प्लास्टिकच्या कपांपेक्षा जास्त भाव खाऊन जात होते. मनोज असो की राजश्री, हर्षवर्धन असो की संजीवनी, कोणीही हाताला सहज येणारा कप न उचलता त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दिसणारा कप उचलत होता. तुटक्या कानाच्या कपाला तर कोणी वालीच नव्हते. अपवाद प्रद्युम्नचा होता, त्याने काहीही खळखळ न करता सहज हाताला येणारा तुटका कप उचलला. गोडांबेबाई मिश्कीलपणे हे सर्व न्याहाळत होत्या. आपले विद्यार्थी खऱ्या अर्थाने भौतिक सुखात रमले असल्याचे पाहून त्या आनंदित होत्या, पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र आपल्या संस्कारांमध्ये काही तरी उणीव राहिली नाही ना, या चिंतेने अस्वस्थदेखील होत्या.

मराठीतील सर्व कॉर्पोरेट कथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporate story personality
First published on: 15-04-2016 at 01:16 IST