लग्न म्हणजे आयुष्यातला महत्त्वाचा दिवस. तो स्मरणीय करण्यासाठी त्या दिवशीचा पेहरावही महत्त्वाचा ठरतो. पण लग्नाच्या विधींमध्ये सुटसुटीतपणे वावरता यावं यासाठी लग्नामध्ये हल्ली हलक्याफुलक्या कपडय़ांना पसंती मिळायला लागली आहे.

पाहुण्यांच्या गोतावळ्यातून वाट काढत, मध्येच एखाद्याने अडवल्यावर लागलेच हसून स्वत:ची सुटका करून घेत, हातातला पाण्याचा ग्लास सांभाळत ती कशीबशी स्टेजपर्यंत पोहचली. तिला येताना पाहून होमासमोर बसलेल्या तिच्या ताईने सुटकेचा नि:श्वास सोडला. एका घोटात पाण्याचा ग्लास रिकामा केल्यावर तिला काहीसं हायसं वाटलं. दोन आठवडय़ांपूर्वी लग्नासाठी हौसेने घेतलेली नाजूक जरदोसी काम केलेली, पिवळ्याधमक रंगाची साडी आता तिला नकोशी झाली होती.

Mothers day special
“एक दिवस माझा मुलगा म्हणाला की, मीही तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो अन्…” वाचा, घरकाम करणाऱ्या महिलांचे अनुभवकथन….
architect of argentina cesar luis menotti
व्यक्तिवेध : सेसार लुइस मेनोटी
chaturang article marathi, chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : नातं… माझं, माझ्याशी!
Preparation Strategy for Competitive Exams
करिअर मंत्र
(L-R) Prajwal Revanna with father H D Revanna. (Photo: H D Revanna/ X)
अग्रलेख : अमंगलाचे मंगलसूत्र
contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?

कधी एकदा हे विधी होताहेत आणि मी रूममध्ये जाऊन साडी सोडतेय असं तिला झालेलं. लग्नाचे विधी उरकल्यावर ‘आता बास’ म्हणून ती खुर्चीवर जरा टेकणार तेवढय़ात रिसेप्शनच्या तयारीसाठी मेकअपमन बाजूला उभा राहिला. पुढचे तीन तास जड घागरा घालून नातेवाईकांच्या पाया पडायचं दिव्य करायचंय या कल्पनेनेच तिला शहारून आलं. वाचताना एखाद्या चित्रपटातील हॉरर सीन वाटला, तरी प्रत्येक लग्नात दिवसभर वेगवेगळ्या लग्नविधी, पाहुण्यांची येजा सांभाळत स्टेजवर हसत उभ्या असलेल्या नवऱ्यामुलीची अवस्था काहीशी अशी होतेच..

दिसायला कितीही स्टायलिश, सुंदर दिसत असले, तरी लग्नातील नवऱ्या मुलीचे कपडे म्हटल्यावर नेट, शिफॉन, लेस, ब्रोकेड, ऑगान्झा सारख्या चुरचुरणारे कापड, जड एम्ब्रॉयडरी, मोठा घेर हे येतच. त्यामुळे दिवसाअखेरीस पाहुण्यांनी कितीही ‘छान दिसतेयस’ म्हणत कौतुक केलं, तरी दोन मिनिटं आरशात आपलं रूप न्याहाळून खूश होण्याची संधी तिला क्वचितच मिळते.

मग आठवडय़ाभराने हातात येणाऱ्या फोटो अल्बममध्ये आपले फोटो बघून तिला समाधान मानावं लागत. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने हल्ली मुलीही लग्नाच्या कपडय़ांची खरेदी करताना लग्नाच्या दिवशीची धावपळ, गोंधळ लक्षात घेऊन सुटसुटीत, आरामदायी कपडय़ांची निवड करण्याकडे भर देऊ  लागल्या आहेत.

अर्थात आपल्या लग्नात आपण ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ असावं ही इच्छा असतेच.

त्यामुळे हे कपडे दिसायलाही तितकेच आकर्षक असतील, याची काळजीही त्या घेताना दिसतात.

अजूनही लग्न विधींच्या वेळी लेहेंगाऐवजी साडी नेसण्याकडे मुलींचा कल असतो. अर्थात साडीमध्ये मिळणारा सुटसुटीतपणा या वेळी महत्त्वाचा असतो.

अर्धा पाऊण तास होमासमोर बसावे लागते. अशा वेळी जॉर्जेट, नेट, लेसच्या साडय़ा दिसायला कितीही आकर्षक दिसत असल्या तरी त्यावरची एम्ब्रॉयडरी, कापडाचा खरखरीतपणा सतत बोचत राहतो. त्यामुळे अंगावर रॅश येण्याचे प्रकार घडतात. पारंपरिक लुकच हवे असेल, तर नऊवारी साडी या वेळी आवर्जून नेसली जाते. त्यामागे मुख्य कारण हेच आहे. चापूनचोपून नेसलेली नऊवारी, सोबत नेमके पण उठून दिसणारे मोत्यांचे दागिने, छानसा अंबाडा किंवा लाबसडक वेणी इतक्या सुटसुटीत लुकमध्येसुद्धा नववधू सुंदर दिसते. अर्थात थोडा वेगळा प्रयोग करायचा असल्यास या विधींच्या वेळी बनारसी सिल्क, कांजीवरम, चंदेरी अशा पारंपरिक पण आरामदायी साडय़ा नेसण्याकडे मुलींचा कल असतो. बहुतेक लग्नांमध्ये विधींच्या नंतर लगेचच रिसेप्शनचा सोहळा असतो. त्यामुळे साडी बदलण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही. त्यामुळे कटवर्क, जरदोसी वर्क केलेला जड शालू नेसण्याऐवजी पैठणी, पटोला सिल्कसारख्या साडय़ा नेसल्या जातात. ही बाब लक्षात घेऊन डिझायनर्सनी या साडय़ांमध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. डिझायनर गौरांग शहा त्याच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये पारंपरिक साडय़ांवर प्रयोग करताना दिसतो. कांजीवरम, पैठणी, बनारसी, पाटण पटोला, कोटा सोबत जरदोसी, गोटा, डोरिया, आरी, चिकनकारी एम्ब्रॉयडरीची सरमिसळ करत तो पारंपरिक साडय़ांमधील साज कायम ठेवत त्यांना मॉडर्न लुक देतो. तसेच या साडय़ांचे बोल्ड पण मोठे बुट्टे किंवा बॉर्डर, लांब पदर, अंगरखासारख्या वेगळ्या पॅटर्नच्या ब्लाऊजमुळे सुटसुटीत असूनही या साडय़ा फोकसमध्ये येतात. ‘आजच्या तरुणीला पारंपरिक साडय़ा आवडत नाहीत असे नाही. पण त्यांना त्यातला तोचतोचपणा खटकतो. या साडय़ा थोडय़ा वेगळ्या पद्धतीने सादर केल्या तर तरुणी या साडय़ांना नक्कीच पसंत करतात,’ असे तो सांगतो.

या साडय़ांमधील लाल, पिवळ्या, सोनेरी, नारंगी अशा पारंपरिक पण उठून दिसणाऱ्या रंगांना तरुणींची पसंती असते. एका साडीमध्ये दोन किंवा अधिक फॅब्रिक्सचा वापर करत साधलेला कॉन्ट्रास इफेक्ट आजही साडय़ांमध्ये पसंत केला जातो. लेस किंवा नेटच्या साडय़ा वापरायच्या असतीलच तर बारीक कलाकुसर अधिक पसंत केली जातात. त्यामुळे या साडय़ा वजनाने कमी असतात.

लग्नातील कपडय़ांचे रंग कोणते असावे, याबद्दलही मुली विचार करू लागल्या आहेत. लग्न म्हटलं की, नववधूच्या कपडय़ांसाठी लाल, पिवळा रंग पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात. पण या नेहमीच्या रंगांना फाटा देत काही वेगळे पण हटके रंग निवडण्याकडे हल्ली तरुणींचा कल असतो. यामध्ये पेस्टल किंवा इंग्लिश रंग, काळा, सफेद, चंदेरी, सोनेरी रंगांना पसंती दिली जाते. सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या पेस्टल शेड्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी यंदा त्यांच्या ब्रायडल कलेक्शनमध्ये सोनेरी, चंदेरी आणि पांढऱ्या रंगासोबत चिकनकारी एम्ब्रॉयडरीचा वापर केला होता. ‘वाराणसी’ या त्यांच्या कलेक्शनसाठी जुना काळ जिवंत करण्यासाठी कमळासारख्या बोल्ड मोटीफचा वापर त्यांनी केला होता.

‘‘आजच्या नववधूला ‘ओल्ड वर्ल्ड चार्म’ भावतो. उगाचच भरगच्च एम्ब्रॉयडरी, डिटेलिंग यापेक्षा सिंपल लुक तिला जास्त भावतो,’’ असे संदीप खोसला सांगतात. पेस्टल रंगासोबत नाजूक, सेल्फ कलरमधील एम्ब्रॉयडरीसुद्धा उठून दिसते. तसेच कॉन्ट्रास परिणाम साधायचा असल्यास गडद रंगाची एम्ब्रॉयडरी वापरता येते. डिझायनर सोनाक्षी राजने तिच्या यंदाच्या कलेक्शनमध्ये बेज, क्रीम, बिस्किट शेडच्या कापडावर नेव्ही, मेहेंदी ग्रीन, मरून रंगाच्या थ्रेडवर्कचा वापर करून गाऊन्स सादर केले होते. मुख्य म्हणजे या शेड्समध्ये मुलीच्या चेहऱ्यावर फोकस येतो त्यामुळे ब्राइट लिप किंवा आय मेकअपमुळेसुद्धा तिचा लुक उठून दिसतो.

रंगासोबतच कपडय़ांच्या पॅटर्नबद्दलसुद्धा मुली चोखंदळ होऊ  लागल्या आहेत. साडी आणि लेहेंगा या पलीकडे जाऊन साडी गाऊन, केप, अंगरखासारखे नवे लुक्ससोबत त्या प्रयोग करताना दिसतात. जॅकेट, हेवी दुपट्टे लग्नाच्या दिवशी दिवसभर सांभाळणे कठीण होऊन जाते. त्यात लेअरिंगमुळे घामाचा त्रास होतो तो वेगळाच.. साडी असो किंवा लेहेंगा चोली, ब्लाऊज फोकसमध्ये घेतल्यास संपूर्ण लुक उठून दिसतो. तसेच कित्येकदा एकच चोली किंवा ब्लाऊज वेगवेगळ्या साडय़ा, लेहेंगासोबत घालता येतो. त्यामुळे या चोली, ब्लाऊजला फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न डिझायनर्स करताना दिसतात. पोलो नेक, बंद गळ्याचे ब्लाऊज पाहायला मिळतात. याशिवाय ब्लाऊजमध्ये झीपर्सचा वापरही केला जातो. ब्लाऊजवर एम्ब्रॉयडरी करून साडी सिंपल ठेवण्याचा ट्रेंडसुद्धा सध्या गाजतो आहे. ब्लाऊजऐवजी जॅकेट्सचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. या जॅकेट्समुळे साडीला राजेशाही लुक तर मिळतोच, पण कित्येकदा लेदर, जर्सी अशा फॅब्रिक्सचा वापर करत त्यांना रॉक लुक पण दिला जातो. कित्येकदा या जॅकेट्सची लांबी थेट पायांपर्यंत असते. लांब स्लिव्ह, किमोनो स्टाईल लूझ लुकच्या केप टॉप आणि लेहेंगा, अंगरखा स्टाइलचा लांब, पायघोळ कुर्ता आणि घागरा, स्कर्ट असे थोडे हटके प्रयोगही केले जातात. मध्यंतरी खास नवाबी स्टाईल ब्रायडल लुकमध्ये ट्रेंडमध्ये होती. त्यामुळे शरारा कट लेहेंगा, केसातील झुमर, लांब पल्लू असा लुकसुद्धा लग्नामध्ये पहायला मिळतो. फिशटेल लेहेंगासुद्धा सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या लेहेंगामुळे वधूची उंची जास्त दिसायला मदत होते. अर्थात लेहेंगाचा घेरा जितका कमी तितकाच त्यांचा सांभाळायचा त्रास कमी असतो. या बाबीकडेही तरुणी आवर्जून लक्ष देतात.

गेल्या काही वर्षांमध्ये लग्न पारंपरिक पद्धतीने करायचे आणि रिसेप्शनची पार्टी मात्र जंगी करायची असही एक ट्रेंड गाजतो आहे. अशा पाटर्य़ामध्ये ऑफिसचे सहकारी, उच्चपदाधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील माणसे, मित्र यांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे खास वेस्टर्न लुकला प्राधान्य असते. हे ध्यानात घेऊन ब्रायडल गाऊनची मागणीही बऱ्यापैकी वाढली आहे. फ्लेअर गाऊन्सना या पार्टीजसाठी मोठी मागणी असते. नुकतेच डिझायनर मनीष मल्होत्रानेही त्याचे ब्रायडल गाऊनचे कलेक्शन सादर केले होते. ८० च्या दशकातील रेट्रो, गॉथिक लुक त्याने या कलेक्शनमध्ये कायम ठेवला होता.

लग्नाचा दिवस प्रत्येकीसाठी तितकाच महत्त्वाचा असतो. त्या दिवशी कपडे, दागिने याच्या ओझ्यामध्ये दबून मूळ सोहळ्याचा आनंद गमावण्याऐवजी आपल्या लुकमध्ये थोडा ट्विस्ट आणायचा प्रयत्न हल्लीच्या नववधू करत आहेत.
मृणाल भगत