पनीर बर्फी 

मंदाकिनी नानिवडेकर 

साहित्य :
१ वाटी पनीर
१ वाटी साखर
दीड वाटी रवा
१ वाटी दूध
८ चहाचे चमचे तूप

कृती :
प्रथम जाड बुडाच्या पातेल्यात मळून मऊ केलेले पनीर, साखर, रवा आणि दूध एकत्र करून घ्यावे.
पातेले मंद आचेवर ठेवून मिश्रण सतत ढवळत राहावे.
मिश्रणात तूप घालावे.
मिश्रण कोरडे पडायला लागल्यावर शेगडीवरून उतरवावे.
तूप लावलेल्या थाळीत मिश्रण थापून घ्यावे.
वरून काजू व पिस्त्याचे काप लावावेत.
गार झाल्यावर बर्फी कापून घ्यावी.

टीप :
मिश्रण गार होण्यास वेळ लागतो. त्यामुळे बर्फी कापण्याची घाई करू नये.

बाजरीची खिची

डॉ. राजश्री नवलाखे

साहित्य :
१ वाटी बाजरीlp31
१/२ वाटी तूरडाळ
१ वाटी तांदूळ
१ चमचा हळद
चवीपुरते मीठ
फोडणीकरिता : २ चमचे मोहरी,
१ चमचा जिरे
२ चमचे बारीक कापलेला लसूण
२ लाल मिरची

कृती :
बाजरी ६-७ तास भिजत ठेवणे. नंतर थोडी कापडावर पसरवणे. थोडी वाळल्यावर मिक्सरमध्ये फिरवणे. तूरडाळ आणि तांदूळ १/२ तास भिजवणे.
कुकरमध्ये बाजरी, डाळ आणि तांदूळ एकत्र करावे. दुप्पट पाणी घालावे. त्यात १ चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालून ३-४ शिटय़ा काढाव्यात.
कुकर थंड झाल्यावर पळीने चांगले घोटावे. आवश्यक वाटल्यास वरून थोडे गरम पाणी घालून पातळ करावी.
मधल्या वेळात एका छोटय़ा कढईत तेल घेऊन मोहरी, जिरे, लसूण आणि लाल मिरचीचे तुकडे घालून फोडणी तयार ठेवावी.
सव्‍‌र्ह करताना वरून फोडणी किंवा तूप घालून सव्‍‌र्ह करावे.

टीप :
ताकाची कढी किंवा बेसनाच्या गोड-आंबट कढीबरोबर छान लागते.
बाजरी भिजायला वेळ लागतो तेव्हा मिक्सरमध्ये बारीक केलेली बाजरी वाळवून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास हवी तेव्हा १-२ तास पाण्यात भिजवून करता येते.