जागेच्या अभावामुळे स्वयंपाकघरे जशी आकाराने लहान व्हायला लागली तशीच घर आणि ऑफिसच्या तालावर नाचणाऱ्या आजच्या स्त्रीसाठी ती सुटसुटीत देखील व्हायला लागली. त्याचाच एक भाग म्हणजे आज लोकप्रिय असलेली मोडय़ुलर किचन्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमच्या व्यवसायात डिझायनर व घरमालक/ मालकीण यांच्यामधील वाद हा नेहमीचाच. तो जास्त मनावर घ्यायचा नसतो. बरेच वेळा वादाचे मुख्य कारण असते कॉन्ट्रॅक्टर्स वेळेवर न येणे किंवा नाहीच येणे, आवाज व कचरा खूप होणे, काम वेळेवर न होणे व सर्वात महत्त्वाचे, झालेले काम मनासारखे (ग्राहकाच्या) न होणे. या प्रकरणात सर्वात वेळखाऊ व किचकट काम कुठले असेल तर स्वयंपाकघराचे. असे म्हणतात की संसारात भांडय़ाला भांडे लागणारच. पण आमच्या या संसारात, न झालेल्या स्वयंपाकघरातील भांडीही एकमेकांना लागून आवाज येत असतो. इथे भातवाढणीपासून सासूच्या सासूने दिलेल्या ठोक्याच्या पातेल्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी जागा करावी लागते. या जागा कधी कागदावर ड्रॉईंग काढून, कधी िभतीवर रेघोटय़ा मारून तर कधी हवेत हातवारे करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. पण बरेच वेळेला त्यांनी कल्पना केलेले स्वयंपाकघर व प्रत्यक्षातील स्वयंपाकघर यांचा मेळ बसत नाही. अशा वेळी निराशा, चिडचीड, पसे फुकट गेल्याची भावना निर्माण होते. खरे तर यामध्ये आमच्या दोघांचाही दोष नसतो. प्रत्येक गोष्ट ‘लाईनी’तच बोलायची आमची सवय, तर त्या रेघा पाहून भंजाळलेले आमचे क्लायंट्स! ‘आम्ही आधीच सर्व सविस्तर सांगितले होते’ या भ्रमाखाली आम्ही, तर ‘आपल्याला सर्व कळले आहे’ या भ्रमात क्लायंट्स. या भ्रमाचा फुगा सर्व काम झाल्यानंतर फुटतो. अशा वेळी वाटते की फायनल प्रॉडक्ट कसे दिसणार आहे याची सोय असली असती तर चांगले झाले असते. अशाने वेळ, पसा यांचा अपव्यय तरी टाळता आला असता. उशिरा का होईना  देवाने आमचे गाऱ्हाणे ऐकले आणि ‘मॉडय़ुलर किचन’नामक जादुई दुनिया अस्तित्वात आली.

मराठीतील सर्व इंटिरियर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modular kitchen
First published on: 07-10-2016 at 01:11 IST