एकेकाळी पाव-बिस्किटं हे पदार्थ आपल्याकडे धर्मबुडवे होते. आज  या पदार्थाशिवाय आपलं पानही हलत नाही. एकवेळ बिस्कि टं खाण्यावर मर्यादा असतील. पण पाव? तो तर नाश्त्याला, मुख्य जेवणात, संध्याकाळच्या खाण्यात, रात्रीच्या जेवणात, मधल्या वेळच्या डब्यात, प्रवासात कुठेही आणि कशाही रूपात आपल्या समोर येऊ शकतो. नव्हे येतोच. गृहिणीसाठी तर देवा मला पाव असं म्हणावं आणि पाव यावा असा प्रकार. भारतीय संस्कृतीने बाहेरून येणारी प्रत्येक गोष्ट सामावून घेतली आणि नंतर ती आपलीशी करून टाकली याची जी असंख्य उदाहरणं दिली जातात, त्यात पाव हा आघाडीवरचा पदार्थ आहे. पाव मैद्यापासून बनवला जातो, मैदा पोटाला हानीकारक आहे, तेव्हा पाव फार खाऊ नका असं डॉक्टर लोक सांगत असले आणि ते बरोबर असलं तरी पाव आता आपल्या आहारात अटळ असाच पदार्थ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्टय़ं म्हणजे तो कोणत्याही वेळेला आणि गोड-तिखट अशा कोणत्याही पदार्थाबरोबर चालू शकतो. तो जॅम लावून खाल्ला जाऊ शकतो, तसा चक्क तूपसाखर लावून खाल्ला जाऊ शकतो. तो जॅमप्रमाणेच चक्क श्रीखंड लावून खाल्ला जाऊ शकतो. त्याच्यावर सॉस स्प्रेड करता येतो तसंच कुठलीही ओली किंवा सुकी चटणी पसरून तो खाता येतो. यातलं काहीच नको असेल तर पावावर लोणी लावून नाश्ता होतो, तसंच तूप  किंवा अमूल बटर लावून तव्यावर किंवा सँडविच मेकरमध्ये भाजून कुरकुरीत करून खाता येतो. उकडलेलं अंडं किंवा आम्लेट आणि पाव हा तर पारंपरिक नाश्ताच. अंडं खात नाहीत ते लोक टोमॅटो आम्लेटबरोबर पाव खाऊन नाश्ता साजरा करतात.

मराठीतील सर्व पोटपूजा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pav bread
First published on: 26-08-2016 at 01:04 IST