साहित्य :
*    १ वाटी तांदूळ
*    पाव वाटी गाजर, पातळ उभे काप
*    पाव वाटी भोपळी मिरची,
उभे पातळ काप
*    पाव वाटी बेबी कॉर्न,
तिरके पातळ काप
*    २ चमचे फरसबी,
तिरके पातळ काप
*    २ चमचे आले-लसूण,
बारीक चिरून
*    २ चमचे तेल
*    १ चमचा मिरचीपेस्ट
*    १ चमचा सोया सॉस
*    २ ते ३ चमचे पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून
*    चवीपुरते मीठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृती :
१)     तांदूळ पाण्यात ४० मिनिटे भिजत ठेवावा. मायक्रोवेव्ह सेफ भांडय़ात १ वाटी तांदूळ, अर्धा चमचा मीठ आणि २ वाटय़ा पाणी घालून आधी ७ मिनिटे हाय पॉवरवर शिजवावे. ढवळून परत ६ ते ७ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये भात शिजवावा.
२)     भात मोकळा शिजला की ताटलीत मोकळा करून ठेवावा.
३)     काचेच्या भांडय़ात तेल घालून १ मिनिट मायक्रोवेव्ह करावे. तेल गरम झाले की त्यात आले, मिरची आणि लसूण घालून १ ते दीड मिनिट मायक्रोवेव्ह करावे.
४)     आले-लसणीचा छान वास आला की त्यात भाज्या मिक्स कराव्यात. मायक्रोवेव्ह सेफ झाकण ठेवून दीड मिनीट वाफ काढावी.
५)     यात सोया सॉस, व्हिनेगर आणि थोडे मीठ घालून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे.
६)     यात गार झालेला भात घालून मिक्स करावे. मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे गरम करावे.
पाती कांद्याने सजवून सव्‍‌र्ह करावे.

मायक्रोवेव्ह नूडल्स
साहित्य :
*    १५० ग्रॅम नूडल्स
*    १ चमचा भरून चिरलेली लसूण
*    १ चमचा चिरलेले आले
*    अर्धा चमचा बारीक चिरलेली
हिरवी मिरची
*    पाव वाटी गाजर, उभे पातळ काप
*    पाव वाटी सिमला मिरची,
उभे पातळ काप
*    २ चमचे बेबी कॉर्न, तिरके काप
*    २ चमचे पाती कांदा,
बारीक चिरून
*    २ चमचे तेल
*    १ चमचा सोया सॉस
*    अर्धा चमचा व्हिनेगर
*    चवीपुरते मीठ

कृती :
१)     नूडल्स मिठाच्या गरम पाण्यात बुडवून ठेवाव्यात. थोडय़ा नरम झाल्या की मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर १ ते २ मिनिटे शिजू द्यावे. शिजलेल्या नूडल्स एकदा गार पाण्यातून काढून निथळून ठेवाव्यात. थोडेसे तेल लावावे.
२)     काचेच्या भांडय़ात तेल घालून १ मिनिट मायक्रोवेव्ह करावे. तेल गरम झाले की त्यात आले, मिरची आणि लसूण घालून १ ते दीड मिनिट मायक्रोवेव्ह करावे.
३)     आले-लसणीचा छान वास आला की त्यात भाज्या मिक्स कराव्यात. मायक्रोवेव्ह सेफ झाकण ठेवून दीड मिनीट वाफ काढावी.
४) यात सोया सॉस, व्हिनेगर आणि थोडे मीठ घालून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे.
५) भांडे बाहेर काढून त्यात नूडल्स मिक्स कराव्यात. १ मिनीट मायक्रोवेव्ह करावे.
पाती कांद्याने सजवून गरमच खायला द्यावे.

नूडल्स थीन सूप
साहित्य :
*    २ ते ३ मश्रुम्स
*    ३ चमचे गाजर, पातळ काप
*    ३ चमचे भोपळी मिरची, पातळ काप
*    २ चमचे कोबी, एकदम बारीक चिरून
*    २ ते ३ बेबी कॉर्न, १ इंचाचे तुकडे
*    १ हिरवी मिरची, बारीक चिरून
*    दीड चमचा लसूण पेस्ट
*    अर्धा चमचा तेल
*    ४ ते ५ वाटय़ा व्हेजिटेबल स्टॉक
*    ३० ग्रॅम नूडल्स
*    पाव टीस्पून पांढरी मिरपूड
*    १ टीस्पून व्हिनेगर
*    १ पाती कांद्याची काडी, बारीक चिरून पांढरा आणि हिरवा भाग वेगवेगळा ठेवावा.
*    चवीपुरते मीठ
कृती :
१)     वरीलप्रमाणे नूडल्स शिजवून घ्याव्यात.
२)     काचेच्या भांडय़ात तेल हाय पॉवरवर १ मिनिट गरम करावे. त्यात लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालावी. ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये परतावे.
३)     गाजर, भोपळी मिरची, कोबी, बेबी कॉर्न, मश्रुम्स आणि पाती कांद्याचा पांढरा भाग घालून मिक्स करावे. मायक्रोवेव्हमध्ये दीड ते दोन मिनिटे मायक्रोवेव्ह सेफ झाकण ठेवून वाफ काढावी.
४)     नंतर व्हेजिटेबल स्टॉक घालून मीडियम पॉवरवर ५ मिनिटे उकळी काढावी. स्टॉक उतू जाणार नाही याची काळजी घ्यावी.
३)     व्हेजिटेबल स्टॉक उकळला की त्यात व्हिनेगर आणि चवीपुरते मीठ घालावे. नूडल्स घालाव्यात आणि अजून एक-दोन मिनिटे हाय पॉवरवर उकळी काढावी. मिरपूड घालून मिक्स करावे.
सर्व्हिंग बोलमध्ये वाढावे आणि पाती कांद्याने सजवून सव्‍‌र्ह करावे.
वैदेही भावे -response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व रुचकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recipes from vaidehi bhave to lokprabha readers
First published on: 12-06-2015 at 01:00 IST