साहित्य:

१ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे)

Open Letter To Mumbai Local
Open Letter To Mumbai Local : “स्पा सेंटर नि ब्युटी पार्लर नको, तू फक्त वेळेत ये, कारण तुझ्या उशिरा येण्याने…”; मुंबई लोकलसाठी खास पत्र
green fried rice ingredients and recipes
अवघ्या काही मिनिटांत असा बनवा ग्रीन फ्राईड राईस; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Make creamy corn chaat in just 10 minutes
फक्त १० मिनिटांमध्ये बनवा क्रीमी कॉर्न चाट; नोट करा साहित्य आणि कृती
Tasty cutlets of recipes
फक्त १५ मिनिटांत बनवा वाटाणा-पोह्याचे टेस्टी कटलेट; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Nachani Or Ragi Dhokla Recipe In Marathi
Healthy Nachani Dhokla Recipe: नाचणीची भाकरी नाही आज नाश्त्याला करा नाचणीचा पौष्टिक ढोकळा; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या
monkey attack on woman
माकडचाळे… महिलेची पर्स बंधाऱ्यात फेकली, २१ हजारासह सोन्याची पोतही वाहून गेली
How to make Egg Sandwich Recipe at Home In Few Ingredients Note Down This Marathi Recipe Andyache Sandwich
Egg Sandwich Recipe: १५ मिनिटांत बनवा ‘अंड्याचे टेस्टी सँडविच’; साहित्य, कृती नोट करून घ्या
Veteran writer Shobha Dey bought a luxurious bungalow in Alibaug worth Rs 8 crore 30 lakh
जेष्ठ साहित्यिका शोभा डे यांनाही अलिबागची भुरळ, खरेदी केला ८ कोटी ३० लाखांचा आलिशान बंगला

३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार

१ चमचा जिरे

१/४ वाटी तेल

१/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून

चवीपुरते मीठ

कृती:

१)     सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत.

२)     कडधान्ये नीट भिजली की त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत.

३)     स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील.

४)     मोड आले की मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पिठाएवढे घट्ट असावे.

५)     चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ घालावे.

६)     नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धिरडय़ाच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी.

७)     टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडी लावणे घेऊन गरमच खावे.

टिप्स:

१)     तुम्हाला आवडीनुसार आणि घरात अव्हेलेबल असलेले कोणतेही कडधान्य वापरू शकता. फक्त वाल किंवा तत्सम उग्र वास असणारे कडधान्य वापरू नये.

२)     यामध्ये ठेचलेली लसूण आणि चिरलेला कांदाही घालू शकतो. तसेच कोथिंबिरीऐवजी पालकाची पाने बारीक चिरून घालू शकतो.

बटाटय़ाचे थालीपीठ

साहित्य:

३/४ वाटी भात (आदल्या दिवशीचा भातही चालेल) (भात मऊ असावा, नसल्यास थोडा वाफवून घ्यावा.)

१ मध्यम कांदा, पातळ उभा चिरून

१ चमचा आंबट दही

ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ

२ चमचे बेसन

१/२ चमचा जिरे

१ चमचा धनेपूड

१/४ चमचा हळद

१/२ चमचा हिरवी मिरची पेस्ट

चवीपुरते मीठ

१/४ वाटी चिरलेली कोथिंबीर

तेल

कृती:

१)     जर भात तडतडीत झाला असेल तर त्यावर पाण्याचा हबका मारून मायक्रोवेव्हमध्ये वाफवून घ्यावा. मऊ  झालेला भात मळून घ्यावा.

२)     यात दही, जिरे, कांदा, कोथिंबीर, हळद, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, २ टीस्पून तेल, बेसन आणि धनेपूड हे सर्व जिन्नस घालून मिक्स करावे.

३)     यात मावेल इतके पीठ घालावे आणि मध्यम असे पीठ मळावे. मोठे गोळे करून तव्यावर थापावे. कडेने तेल सोडून मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. ३-४ मिनिटे एक बाजू शिजली की झाकण काढावे. आच थोडी वाढवून ती बाजू खमंग करून घ्यावी.

४)     नंतर उलथून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्यावी.

दह्य़ाबरोबर सव्‍‌र्ह करावे.

खजुराचे लोणचे

साहित्य:

१ वाटी खजुराचे मध्यम तुकडे

१/२ वाटी गूळ, चिरलेला

२ चमचे लिंबाचा रस

१ चमचा आल्याच्या पातळ आणि लहान चकत्या

३-४ हिरव्या मिरच्या, मध्यम तिखट, बारीक चिरून (किंवा लाल तिखट वापरले तरी चालेल)

चवीपुरते मीठ (साधारण १/२ ते १ चमचा)

कृती:

१)     गूळ एका जाड पातेल्यात घ्यावा. त्यात २-३ चमचे पाणी घालावे (साधारण गूळ फक्त भिजला पाहिजे). मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळेस्तोवर ढवळावे. गूळ वितळला की आच बंद करावी.

२)     गूळ थोडा कोमट होऊ द्यावा.

३)     नंतर त्यात आल्याच्या चकत्या, मिरची, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करावे. त्यात खजूर घालावा.

हे लोणचे लगेच खाल्ले तरी चालेल.

टीप:

१)     सर्व साहित्य ताजं असायला हवं. फ्रिजमधील मिरची, लिंबू वापरू नये. यामुळे लोणचे टिकत नाही.

वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com