कुठच्याही बागेत किंवा बंगल्यावर पाटी असते की, फुले तोडू नयेत. लहानपणी मला फुले खूप आवडायची. आम्ही विकत घेऊन घालायचो. हौसेला मोल नसते. असो. नमनाला धडाभर तेल पुरे! फुले सर्वाना आनंद देतात. फुललेली फुले बघून तर वेडच लागते आणि त्यांच्या सुगंधाची दखल तर मानसिक समाधान देते. अर्थात काही फुलांना वास नसतो. पण ती झाडावर छान दिसतात. त्यांना तोडल्यावर थोडय़ा वेळात बावतात; म्हणून पाटी लावत असावेत की, फुले तोडू नयेत; ते आता मोठे झाल्यावर कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्रियांना फुले केसात माळायला आवडतात. म्हणजे फुले तोडल्यावरच गजरा बनणार ना? फुले देवाला वाहायला लागतात, घरात फुले ठेवल्यावर वातावरण प्रसन्न होते. त्यामुळे झाडावर फुले ठेवून कसे चालेल? आता तर फुलांचा व्यापार करतात. आपले गुलाब परदेशातपण जातात; त्याकरिता व्यापारी मोठमोठय़ा बागा तयार करतात. लग्नात व इतर समारंभातपण फुलांचा सर्रास व्यापार करतात. म्हणजे फुलांना झाडावरून खाली उतरवणे आलेच! गुलाबापासून शिकण्यासारखे आहे – काटय़ात राहून फुलायचे. काटे असले; तरी गुलाब तोडतोच. ‘व्हॅलेंटाईन डे’ला तर ऊतच येतो. प्रेमिकच नव्हे तर सर्व जण एकमेकांना फुले देऊन आपले प्रेम दाखवत असतात.

मराठीतील सर्व वाचक लेखक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flowers
First published on: 23-09-2016 at 01:13 IST