तसं म्हटलं तर जगात दोनच प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे मांजर हा प्राणी प्रचंड आवडणारे आणि दुसरे म्हणजे मांजर अजिबात न आवडणारे. मांजर आवडणाऱ्यांसाठी मांर्जारपुराण हा कधीही न संपणारा विषय असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या पाळीव प्राण्याविषयी लेख लिहावा, असं वाटल्यावर पहिला विचार मनात आला, की पुलंनी तर आपली मोठी गोची करून ठेवली आहे. कारण पाळीव प्राण्याविषयी लिहिताना त्याच्याविषयीचं कौतुक ओघानं आलंच. ‘मी आणि माझे हितशत्रू’मध्ये पुलंनी पाळीव प्राण्यांचे कौतुक करणाऱ्यांवर असे काही मार्मिक विनोद केले आहेत, की हे नक्की आपल्याविषयीच आहे, असं प्रत्येक प्राणिप्रेमीला वाटावं. पण लिहायला घेताच लक्षात आलं की, हा तर दुहेरी आनंद आहे. एकीकडे आपल्या आवडत्या विषयावर लिहिण्याचा आनंद तर त्याचवेळी स्वत:च्याच प्राणिप्रेमाकडे तटस्थपणे बघत स्वत:वरच हसण्याची मजा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cat stories
First published on: 11-12-2015 at 01:09 IST