scorecardresearch

लोकप्रभा दिवाळी २०२० – कोविड‘उत्तर’ : आता पुढे काय?

यंदा या महासाथीत दिवाळी कशी असेल? साजरं करावं असं काही असेल का शिल्लक? सगळेच विचित्र प्रश्न!

लोकप्रभा दिवाळी २०२० – कोविड‘उत्तर’ : आता पुढे काय?
‘तुरुंगात दिवाळी काही निराळी असेल का?’ मी अगदी सहज विचारून गेले माझ्या मैत्रिणीला

प्राजक्ता पाडगावकर
लोकप्रभा दिवाळी २०२०

कोविडने प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण केले. सतत धावणारं जग बंद पाडलं. सर्वच स्तरांवर निराशाजनक स्थिती उद्भवली. जिवंत राहण्यासाठी, तगून राहण्यासाठी आज प्रत्येकाला धडपडावं लागत आहे. अशा स्थितीत हताश होण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडता येईल, यावर विचार करणं सकारात्मकतेकडे नेऊ शकतं. कोविडमुळे उद्भवलेल्या समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न..

‘तुरुंगात दिवाळी काही निराळी असेल का?’ मी अगदी सहज विचारून गेले माझ्या मैत्रिणीला आणि मग विचारलं, ‘आउश्वितमधला नाताळ कसा असेल’, तुरुंगात साजरं  करण्यासारखं खरंच काही असतं का? यंदा या महासाथीत दिवाळी कशी असेल? साजरं करावं असं काही असेल का शिल्लक? सगळेच विचित्र प्रश्न! वर्ष २०२० सुरू होताना जो जल्लोष होता, तेव्हा कोणी हे प्रश्न विचारले असते तर वेडय़ात काढलं असतं आपण त्या प्रत्येक माणसाला, मात्र आता खरोखर दिवाळी येऊन ठेपल्यावर, कुठे तरी हेच प्रश्न अनेकांच्या मनात लुकलुकत आहेत.

माझ्या या विचाराने पुष्कळ बेचैन झाले, आउश्वित म्हणजे जगातला सर्वात भयाण तुरुंग, त्यातली किती मंडळी आज जिवंत असतील, लॉकडाऊनमध्ये? त्यांना आत्ता नेमकं काय वाटत असेल?

माझ्या अंतरीच्या प्रश्नांना उत्तर मिळालं! एक मुलाखत सापडली! आंतरजाल मोठीच विस्मयकारी चीज आहे, जे मनात ते सापडतेच, अर्थात तो विस्मयाचा भाग नसून तंत्रज्ञाचा आहे! मुलाखत होती एका अमेरिकन निवृत्त सेनाधिकाऱ्याची आणि त्याने आउश्वितमधून जिला सोडवले अशा मुलीची! जेव्हा या सेनाधिकाऱ्याची तुकडी ऑस्ट्रियाच्या सीमेवर पोहोचली तेव्हा तिथे अनेक मृत ज्यूंचे ढिगारे पडलेले आढळले, त्या ढिगाऱ्यात एकच हात थोडा हलला, युद्धाच्या त्या बाक्या प्रसंगी शेवट जवळ येईतो आपण भ्रमिष्ट तर झालो नाही ना, असा विचार मनात येऊनदेखील त्या अधिकाऱ्याने त्या ढिगाऱ्यातून तो हात ज्या मुलीचा होता, तिला काढलं, ती खरोखर जिवंत होती! १७ वर्षांंची इव्हा! योग्य ती मदत मिळाली, ती पोर वाचली! साल होते १९४५!

आज तो पोरसवदा सेनाधिकारी होता शंभरी गाठत चाललेला! त्याच्या नातवाने त्याला लॅपटॉप स्क्रीनसमोर आधार देऊन बसवलेले! त्याला कदाचित त्याने दुपारी काय जेवण केले तेही आठवत नव्हते, मात्र तो १९४५चा प्रसंग अगदी स्पष्ट आठवत होता! स्क्रीन उजळला आणि क्षणात त्याला एक आकर्षक वृद्धा दिसली! तिने तिचे नाव सांगितल्याबरोबर हा पोलादी सैनिक भावुक झाला – ती इव्हा होती! आज ती डॉ. ईडिथ इव्हा इगर होती! दोन जगविख्यात पुस्तकांची लेखिका आणि ४० वर्षे मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेली ही ९२ वर्षांंची उत्साही पोरगी!

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा ( Vishesha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या