नित्यनेमाने अथर्वशीर्ष म्हटलं जात असलं तरी त्याचा अर्थ माहीत असतोच असं नाही. वास्तविक अथर्वशीर्ष हे छोटंसं उपनिषद आहे. सगुण साकार अशा गणेशमूर्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकारापर्यंत कसं पोहोचायचं ते अथर्वशीर्ष आपल्याला सांगतं, म्हणून ते महत्त्वाचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपतीच्या दिवसांत घरोघरी आरत्या, देवे यांचे रंगलेले सूर ऐकू येतात आणि त्याच जोडीने ऐकू येतं ते धीरगंभीर आवाजात म्हटलं जाणारं गणपती अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष हे एक छोटंसं उपनिषद आहे. छोटय़ा आकारात मोठा अर्थ हे उपनिषदाचं वैशिष्टय़ अथर्वशीर्षांतही आढळून येतं. गणपती अथर्वशीर्षही आकाराने छोटंसं आहे. त्यात फक्त दहा मंत्र आहेत, पण प्रत्येक मंत्र त्या परब्रह्माचा विचार करायला लावणारा  आहे. त्याच्या आधाराने आपण परब्रह्माचा हा विचार कधी निर्गुणाच्या माध्यमातून करतो तर कधी सगुणाच्या माध्यमातून करतो. अथर्वशीर्ष हा अथर्व वेदातला भाग आहे. काही जणांच्या मते अथर्वशीर्ष या शब्दाची फोड-अथर्व वेदात सांगितलं गेलेलं, तर शीर्ष म्हणजे उच्चतम ज्ञान. तर काहींनी अथर्वशीर्ष शब्दाची आजच्या काळाला साजेशी फोड करताना थर्व म्हणजे चंचल, शीर्ष म्हणजे डोकं, आणि अ म्हणजे अभाव असा अर्थ सांगितला आहे. चंचलपणाचा अभाव असलेलं डोकं म्हणजेच शांत, स्थिर डोकं. म्हणूनच मन आणि डोकं शांत ठेवण्याची विद्या म्हणजे हे अथर्वशीर्ष!

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganapati atharvashirsha
First published on: 02-09-2016 at 01:26 IST