राजस्थानात नेहमीच्या पर्यटनस्थळांजवळ काही प्रसिद्ध तर काही अप्रसिद्ध पण पाहण्यालायक देवीची मंदिरे आहेत, त्याबद्दल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबिकामाता मंदिर,  जगत
राजस्थानातील उदयपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर जगत गाव आहे. या गावात दुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील सिंहावर आरूढ असलेल्या दुर्गा देवीला अंबिका या नावाने ओळखले जाते. महिषासुर मर्दिनीच्या रूपात असलेल्या या देवीला शक्तीचे रूप म्हणून पुजले जाते. जगतमधील हे मंदिर नवव्या शतकात बांधलेले आहे. सभामंडपातील शिलालेखात ११ व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. स्थानिक दगडात बांधलेल्या या पूर्वाभिमुख मंदिराच्या बाहेरच्या िभतीवर आणि आतल्या बाजूस अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या िभतीवर असलेल्या मथुन शिल्पामुळे या मंदिराला मेवाडचे खजुराहो या नावानेही ओळखले जाते. मंदिराच्या अधिष्ठानाच्या वर तीन शिल्पपट्टय़ा आहेत. सर्वात खालच्या शिल्पपट्टीवर व्याल कोरलेले आहेत. मधल्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेले आहेत. तर सर्वात वरच्या शिल्पपट्टीवर वादन करणारे गंधर्व, किम्न्नर कोरलेले आहेत. मंदिराच्या बा िभतींवर विविध केशभूषा, वेशभूषा केलेल्या सूरसुंदरी कोरलेल्या आहेत. त्यांच्या बाजूला विविध रूपांतले व्याल कोरलेले आहेत. गाभाऱ्याच्या मागील देवकोष्टकात महिषासुर मर्दनिीची अप्रतिम मूर्ती आहे. आपल्या हातातील त्रिशूळाने देवीने महिषासुराच्या पाठीवर वार केलेला आहे. महिषासुराच्या मागच्या भागावर सिंहाने हल्ला केलेला आहे आणि महिषासुर मानवरूपात प्रकट होऊन देवीची करुणा भाकत आहे असे सुंदर शिल्प कोरलेले आहे. उत्तर आणि दक्षिणेकडे असलेल्या देवकोष्टकात चामुंडा आणि सरस्वती ही देवीची रूपे साकारलेली आहेत. देवकोष्टकाच्या वरच्या बाजूस वादक विविध वाद्य्ो वाजवताना दाखवलेले आहेत. इतर देवकोष्टकात देवीची विविध रूपे साकारलेली आहेत. उत्तरेला कुबेर आणि ईशान्य दिशेला वायू देवकोष्टकात विराजमान झालेले पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goddess temple in rajasthan
First published on: 15-09-2017 at 01:05 IST