थेट जनमानसात खोलवर रुजलेली अशी ही देवता  सर्वच स्तरांमध्ये दिसून येते. सर्वमान्य असं हे हनुमानाचं रूप आलं कुठून? त्याच्या मूर्तिरूपातून त्याची कोणकोणती वैशिष्टय़ं आढळतात? त्यातून या देवतेविषयी नेमकं काय समजतं ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हनुमान हे एक लोकप्रिय दैवत आहे. उपदेवतांमध्ये त्याची गणना होत असते. श्रीरामाचा प्रमुख सेवक म्हणून तो ओळखला जातो. तो शक्ती, भूत, प्रेत, पिशाच्च यापासून सुटका करणारा मानला जातो. तंत्रात त्याला स्थान आहे. हनुमान, अंजनेय, महावीर, महाबली इत्यादी त्याची नावं आहेत. गावोगावी आणि गावाबाहेर झाडाखाली आणि ओटय़ावर शेंदूरचर्चित अशी मारुतीची मूर्ती सामान्यत: महाराष्ट्रात सर्वदूर पाहायला मिळते. मारुतीचं महत्त्व लोकप्रिय करण्याचं काम उत्तरेत तुलसीदासांनी आणि दक्षिणेत समर्थ रामदासांनी केलं.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about lord hanuman
First published on: 22-04-2016 at 01:18 IST