जमदग्नीची पत्नी आणि परशुरामाची माता असणारी रेणुकादेवी मरिअम्मा, येल्लम्मा अशा नावांनी दक्षिण भारतातही ओळखली जाते. या देवीचे मूळ स्वरूप नेमके कसे होते आणि तिच्या दैवत्वाचा विस्तार कसा होत गेला हे दैवतशास्त्रीय दृष्टिकोनातून जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परशुरामाचे माता-पिता म्हणून रेणुका आणि जमदग्नी हे दाम्पत्य जनमानसात प्रसिद्ध आहे. जमदग्नी हा नांवाप्रमाणेच (धुमसणारा अग्नी) अत्यंत तापट असणारा भृगुकुलोत्पन्न ऋषी होता. जमदग्नीचा सर्वात प्राचीन उल्लेख ऋग्वेदात येत असला तरी रेणुकेचा संदर्भ मात्र आपल्याला पहिल्यांदा महाभारतात सापडतो. जमदग्नी आणि रेणुकेचा उल्लेख असणाऱ्या दोन कथा महाभारतामध्ये आल्या आहेत. वनपर्वातील कथेमध्ये जमदग्नी आणि रेणुकेला रुमण्वान, सुषेण, वसू, विश्वावसू आणि परशुराम असे पाच पुत्र असल्याचे वर्णन सापडते. एकदा रेणुकेचे पुत्र फळे इत्यादी खाण्याचे जिन्नस गोळा करून आणण्यासाठी वनात गेले असता ती पतीच्या अनुज्ञेने स्नानाकरिता नदीवर जाते. स्नान करून परत येत असता तिला आपल्या स्त्रियांसोबत क्रीडा करणारा चित्ररथ राजा दिसतो. अशा प्रकारे अचानक नजरेस पडलेले दृश्य पाहून राजाच्या वैभवामुळे त्याच्याशी क्रीडा करण्याची स्पृहा रेणुकेच्या मनात उद्भवते. अशा मनोविकारांनी ग्रस्त होऊन ओलेत्या वस्त्राने आणि म्लानमुखाने आश्रमात परत आलेल्या रेणुकेकडे दृष्टिक्षेप टाकताच जमदग्नीस अन्तज्र्ञानाने सर्व वृत्तान्त समजतो. क्रोधाविष्ट जमदग्नी वनातून परत आलेल्या एकेका मुलाला त्याने रेणुकेचा वध करावा अशी आज्ञा करतो. मात्र मातृप्रेमामुळे पहिल्या चारपकी एकही पुत्र ही आज्ञा पाळण्यास तयार होत नाही. शेवटी जमदग्नी त्यांना पशुयोनीत जन्म घेण्याचा शाप देऊन परशुरामास तशीच आज्ञा करतो. परशुराम मात्र वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून तत्काळ आपल्या परशूने मातेचा शिरच्छेद करतो.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabharat and renuka
First published on: 30-09-2016 at 01:27 IST