रोहित वेमुला या विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि त्यापाठोपाठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमधील घोषणाबाजीच्या प्रकरणामुळे विद्यापीठ पातळीवरील राजकारण चर्चेत आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सर्वच विद्यापीठांतील वातावरण राजकारणाने गढुळले आहे. विद्यापीठातील, उच्चशिक्षण संस्थेतील एकूणच राजकारण हा संशोधनाचा विषय ठरावा इतके त्याने गंभीर वळण घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या निवडणुका असोत की महाराष्ट्रासारख्या राज्यातील सिनेट वगैरेच्या निवडणुका असोत, तिथे लोकशाहीच्या नावाखाली चालते ते फक्त पक्षीय अन् जातीय राजकारण. उद्याचे नेते, भावी राजकारणी, मंत्री ह्य तरुण पिढीतूनच निर्माण होणार आहेत असे म्हणून ह्य निवडणुकीकडे मोठय़ा आशेने पाहिले जाते. काही ठरावीक मंडळी विशिष्ट रंगाच्या झेंडय़ाखाली एकत्र येतात. विशिष्ट रंगाचे उपरणे गळ्यात घालतात, विशिष्ट रंगाचा टिळा लावतात, अन् त्या त्या पक्षाची आगलावी भाषा बोलून प्रशासनाला धारेवर घेतात. पूर्वी तर विद्यार्थी निवडणुका म्हटल्या की रणकंदन असेच समीकरण होते. म्हणजे शैक्षणिक वातावरण राहिले एकीकडे, ह्य निवडणूक काळात हाणामारी, भांडणे, उणेदुणे, जहाल भाषणे ह्यलाच महत्त्व. पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे अशा निवडणुकांतदेखील पैशांची उधळपट्टी, किमती गाडय़ांचे ताफे, मोटारसायकलवरून भरधाव रॅलीतून धावणारी धनदांडगी तरुणाई हे कुठल्याही विद्यापीठ कॅम्पसमधील त्या काळातील कॉमन दृश्य होते. गेली काही वर्षे ह्य निवडणुका बंद असल्या अन् गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी प्रतिनिधींची निवड होत असली तरी त्यामागेदेखील राजकारणी पक्षीय बलाबल कार्यरत असल्यामुळे, निकाल लागल्यानंतर बातम्या येतात ते ह्य विद्यापीठावर अमुक पक्षाचा झेंडा अन् त्या विद्यापीठावर तमुक पक्षाचे वर्चस्व अशाच.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit vemula and jnu controversies
First published on: 26-02-2016 at 01:08 IST