-सुनिता कुलकर्णी
सध्या अनेकजण समाजमाध्यमांवर आपण पूर्वी केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनाची छायाचित्रं टाकून ‘गेले ते दिन गेले’ किंवा ‘आता परत कधी हे दिवस बघायला मिळणार?’ असे प्रश्न विचारताना दिसत आहेत. खूप काळ घरात बसल्यानंतर असं वाटणं साहजिक आहे. त्यात हे शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्यांचे, मुलाबाळांना घेऊन फिरण्याचे दिवस.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदूषण कमी झाल्यामुळे पंजाबातूनच नाही तर उत्तर भारतातूनही हिमालयाच्या रांगा दिसत असल्याची छायाचित्रं प्रसिद्ध होत आहेत. माणसांचा वावर कमी झाल्यामुळे वन्य प्राणी अधिक निर्धास्तपणे फिरत असल्याचं पहायला मिळत आहे. औद्योगिक प्रदूषण कमी झाल्यामुळे नद्यांचंही प्रदूषण कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत.

म्हणजे भटकंती करायला एकदम सही वातावरण. पण करोनाने सगळ्यांना घराच्या उंबऱ्याच्या आतच बसवलेलं आहे. असू दे, करोनाच्या या उत्पातात ऑनलाइन जगाने मात्र घरबसल्या जगाची सफर घडवून आणायचा चंग बांधला आहे. https://Yougoculture.com
या साइटवर जाऊन तुम्ही अथेन्सची सफर अगदी घरबसल्या करू शकता.

http://en.chateauversailles.fr/discover-estate
या साइटवर जाऊन तुम्ही फ्रान्समधलं पॅलेस ऑफ व्हर्सैलस अगदी घरबसल्या बघू शकता.

https://www.google.com/maps/about/behind-the-scenes/streetview/treks/taj-mahal/
या साइटवर गेल्यावर तुम्हाला जगातल्या सात आश्चर्यांपैंकी एक असलेला ताजमहाल घरबसल्या बघता येईल.

http://www.youvisit.com/tour/machupicchu
या साइटवरून तुम्ही इंका साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेले, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेले माचूपिचू अगदी आरामात घरी बसून बघू शकता.

https://www.google.com/maps/about/behind-the-scenes/streetview/treks/pyramids-of-giza/
या साइटवर जाऊन तुम्ही घरबसल्या गिझाच्या पिरॅमिड्सची आभासी सफर करू शकता.

आपण आज अशा काळात जगत आहोत की आपण जगाकडे जाऊ शकत नसलो तर जग आपल्या दारात येऊन उभं राहू पाहतंय. तेव्हा त्याचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The world is at your door msr
First published on: 03-05-2020 at 14:56 IST