होम अप्लायन्सेसची खरेदी करताना बहुतांश वेळा आपण त्यातील तंत्रज्ञानाबाबत विक्रेत्यावरच अवलंबून असतो. पण आपल्या गरजेनुसार आपल्याला नेमके कोणते तंत्रज्ञान उपयोगी आहे याची किमान माहिती असणे गरजेचे आहे.

मोबाइल, स्मार्टफोन, लॅपटॉप या साऱ्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये कमालीचा बदल होत असताना होम टेक्नॉलॉजीतही झपाटय़ाने बदल होताना दिसत आहेत, परंतु त्यातील बहुतांशी बदल हे आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. बऱ्याचदा घरात लागणारी ई-अप्लायन्सेस उदा. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह ओव्हन इ. आपण खरेदी करायला जातो तेव्हा फारशा बाबींचा विचार न करता दुकानदाराने सांगितलेल्या फीचर्सपैकी आपल्याला आवडलेले मॉडेल निवडतो व लागलीच घरी घेऊन येतो. त्यातील अनेक बारकाव्यांचा आपण बहुतेकदा विचारच करत नाही. कधी कधी त्यातील अनेक छोटे छोटे फीचर्स खूप महत्त्वाचे आणि निर्णायक ठरू शकतात. वॉशिंग मशीनच्या खरेदीतदेखील अशाच काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
वॉशिंग मशीन हे आज जवळजवळ प्रत्येकाच्या घरात कॉमन झाले आहे. आपण जरा आठवून पाहिलंत तर आपल्याला लक्षात येईल की आपण मोबाइल खरेदी करताना जेवढी काळजी घेतो, विचारपूस करतो तेवढी वॉशिंग मशीन घेताना करत नाही. कारण त्यातील नवीन तंत्रज्ञानाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. म्हणूनच वॉशिंग मशीन खरेदी करतेवेळी कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊ या.
वॉशिंग मशीन खरेदीपूर्वी
वॉशिंग मशीन खरेदी करण्यापूर्वीच अनेक बाबींचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे असते.
वॉशिंग मशीन हे उपकरण अतिशय गरजेचे सोयीचे उपकरण आहे. आपल्या दररोजच्या कामात कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ या यंत्रामुळे नक्कीच वाचू शकतो, परंतु याचबरोबर एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायलाच हवी ती म्हणजे वॉशिंग मशीन कितीही चांगल्या कंपनीचे व फार चांगल्या सोयी-सुविधायुक्त असले तरी स्वत: धुतलेल्या कपडय़ाइतके स्वच्छ कपडे त्यात धुतले जातील असे नाही. बऱ्याचदा आपल्या वापरातील शर्ट्सचे कफ्स आणि कॉलर आपल्याला हातानेच धुवावे लागतात, कारण ते मशीनमध्ये आवश्यकतेनुसार स्वच्छ होत नाहीत. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पाण्याची उपलब्धता. वॉशिंग मशीनला निश्चितच जास्त पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे मशीन विकत घेण्याआधी ते चालविण्यासाठी आपल्याकडे मुबलक पाणी उपलब्ध होते की नाही याचा नक्की विचार करावा. तसेच वॉशिंग मशीनमध्ये जास्त क्षमतेच्या मोटारचा वापर केलेला असतो, त्यामुळे यासाठी जास्तीच्या विजेचा वापर केला जातो. सध्या बाजारात एनर्जी एफिशिअंट मशीन्स आली आहेत, ज्यांना कमी वीज लागते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं बजेट. कमीतकमी चार हजारांपासून ते ३० ते ४० हजारांपर्यंतची वॉशिंग मशीन्स बाजारात सध्या उपलब्ध आहेत. त्यातील आपल्याला बजेटवर मशीनची खरेदी अवलंबून असते.

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

ऑटोमॅटिक की सेमी ऑटोमॅटिक?
अर्थातच मशीन घ्यायचे ठरविले की ऑटोमॅटिक घ्यायचे की सेमी ऑटोमॅटिक हा सर्वात पहिला प्रश्न आपल्यासमोर असतो. ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिकमध्ये असणारा मुख्य फरक म्हणजे सेमी ऑटोमॅटिक मशीन्समध्ये वॉशर टब आणि ड्रायर टब हे वेगवेगळे असतात, तर ऑटोमॅटिक मशीनमध्ये ते दोघेही एकाच टबमध्ये असतात. त्यामुळे सेमी ऑटोमॅटिक मशीन, ऑटोमॅटिक मशीन्सच्या तुलनेत जास्त जागा व्यापतात. सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये कपडे मशीनमध्ये टाकणे, त्यात योग्य पातळीपर्यंत पाणी भरणे, आवश्यक तेवढा वेळ ते फिरविणे, त्यानंतर ड्रायर टबमध्ये टाकणे ही सारी कामे आपल्याला स्वत:लाच करावी लागतात, तर ऑटोमॅटिक मशीन्समध्ये मात्र ही सारी कामे मशीनद्वारे आपोआप केली जातात. म्हणजे घरातील सर्व मंडळी कामावर जाणारी असतील तर जाताना फक्त ऑटोमॅटिक मशीनमध्ये कपडे टाकायचे व प्रोग्राम सेट करून जायचे. आपण संध्याकाळी घरी येईपर्यंत मशीन आपले कपडे धुवून वाळवून तयार ठेवतो. त्यामुळे जागा व सोय यांचा विचार करता सध्या अॉटोमॅटिक मशीन्स घेणे नक्कीच सोयीस्कर ठरतात, पण ही मशीन्स हाताळण्यास जरा नाजूक व सेमी ऑटोमॅटिकपेक्षा थोडी महाग असतात. शिवाय ऑटोमॅटिक मशीन्समध्ये जरा बिघाड झाला तर दुरुस्ती खर्चीक असू शकते. त्यामुळे सेमी की ऑटोमॅटिक यामध्ये निर्णय घेण्याआधी वरील गोष्टींचा नक्की विचार करा.

मशीनची क्षमता कशी मोजतात? वॉशिंग मशीनची क्षमता ही त्याच्या वॉशटबमध्ये आपण किती कपडे सर्वाधिक सक्षमतेने धुवू शकतो यावर ठरत असते. ही क्षमता किलोग्रॅममध्ये मोजली जाते. साधारण कुटुंबासाठी ६ ते ६.५० किलो क्षमतेचे मशीन उपयुक्त असते. यामध्ये लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे जर आपण उगीच जास्त क्षमतेचे वॉशिंग मशीन घेतले व आपले कमी कपडे या जास्त क्षमतेच्या मशीनमध्ये धुतले तर कपडे लवकर खराब होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ऑटोमॅटिक मशीन्समध्ये विविध प्रोग्रामची रचना करण्यात आलेली असते, ज्याला वॉश प्रोग्राम असे म्हणतात. क्षमतेनुसार किमतीतही बदल होत जातो.
कोणत्या कंपनीचे मशीन घ्यावे?
ऑटोमॅटिक की सेमी ऑटोमॅटिक हा तिढा सुटला की पुढचा यक्षप्रश्न आपल्यासमोर असतो, तो म्हणजे मशीन कोणत्या कंपनीचे घ्यायचे? सध्या मोबाइलप्रमाणे ही बाजारपेठ विस्तारत आहे. व्हर्लपूल ही वॉशिंग मशीन्सच्या बाजारातील सर्वात जुनी अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीच्या सर्व मशीन्समध्ये अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असतो. परंतु या वॉशिंग मशीन्सचा मोठा तोटा म्हणजे ही मशीन्स फार काळ टिकत नाहीत व अमेरिकन कंपनी व अद्ययावत तंत्रज्ञान बिघडल्यावर आपल्याकडे किती लवकर दुरुस्त होईल याबाबत शंका असते. भारतात एलजी, व्हिडीओकॉन व ऑटोमॅटिक मशीन्सच्या विभागात सॅमसंग हे काही अग्रणी ब्रॅन्ड आहेत. त्यांची सव्र्हिस व टिकाऊपणा हा चांगला आहे. व्हिडीओकॉन हा भारतात सवरेपयोगी ब्रॅन्ड मानला जातो. शिवाय गोदरेज कंपनी भारतीय बाजारात मशीन्समध्ये चांगलीच आघाडीवर असून उत्तम तंत्रज्ञानासह भारतीय बाजारात लोकांच्या उपयुक्ततेचा विचार त्यांच्या मशीन्समध्ये दिसतो. त्यामुळे गोदरेज मशीन्सनादेखील अनेकजण प्राधान्य देतात. परंतु कोणत्याही ब्रॅन्डचे मशीन घेण्यापूर्वी त्या कंपनीच्या विक्रीउत्तर सेवांबद्दल सर्व माहिती घ्यावी.
एगीटेटर व कपडे धुण्याच्या पद्धती
मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी एगीटेटर हा मुख्य भाग असतो. वॉशटबमध्ये मध्यभागी असणाऱ्या या उभ्या दांडय़ाद्वारे कपडे पुढे-मागे फिरविले जातात व योग्य प्रकारे धुतलेही जातात. काही जुन्या मशीन्समध्ये एगीटेटर वापरले जात नसत. पण त्याबाबत कपडे अडकण्याचा अनुभव आल्यामुळे तक्रारी वाढल्या. सेमी ऑटोमॅटिक प्रकारात आजही अशी काही मशीन्स असतात जी घेणे सहसा टाळावे. काही नवीन मशीन्समध्ये एगीटेटर कमी करण्यात आला आहे. गोदरेज कंपनीने सेमी ऑटोमॅटिकरेंजमधली एगीटेटरमध्ये काही बदल करुन एगीटेटर हवा असणाऱ्यांसाठी काही मशीन्स बाजारात आणली आहेत, जी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय बाजारात इंपेलर वॉश टाइप (बारीक छिद्रे असणारा टब) असणारी मशीन्स आहेत जी अजिबात उपयुक्त नाहीत. त्यात कपडे बऱ्याचदा खराब होतात. टबच्या असमतोलामुळे मध्येच मशीन थांबून राहते, अशा अनेक समस्या येतात. त्यामुळे या प्रकारातील मशीन्स घेणे टाळलेलेच बरे. त्यानंतर आपल्या मशीनमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे धुतले जातात याबद्दल योग्य माहिती आपल्याला असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे मशीन विकत घेताना वॉश प्रोग्रामबद्दल आपल्या दुकानदाराकडे नक्की चौकशी करावी. पल्सेटर टाइप हा त्यातील सर्वात महत्त्वाचा टाइप आहे. याशिवायही अनेक विविध प्रकारची वॉश सिस्टीम असणारी मशीन्स बाजारात आहेत, परंतु तुलनेने ती महागडी आहेत.

फीचर्स कोणकोणती असावीत?
आपलं मशीन हे हलकं आणि आपल्याला सहज हलविता येऊ शकेल असे असावे आणि त्याच वेळी ते टिकाऊदेखील असावे यासाठी चांगल्या प्रतीच्या प्लास्टिक अथवा स्टीलच्या मशीन्सना प्राधान्य द्यावे.
आपल्या मशीनमध्ये कोणकोणते फीचर्स असावेत हे आपल्या गरजेनुसार ठरविता येते. जर आपल्याकडे बोअरवेलचे पाणी येत असेल तर त्या थंड पाण्यात वॉशिंग पावडर नीट मिसळत नाही त्यासाठी ऑटोमॅटिक (काही सेमी ऑटोमॅटिकमध्येही) हॉट वॉटर वॉश सुविधा उपलब्ध असते, ज्यामध्ये पाणी गरम केले जाते आणि त्या गरम पाण्यात कपडे धुतले जातात.
आपल्या मशीनमध्ये धुतले जाणारे कपडे हे मातकट अगर मातीने भरलेले असतील तर साध्या मशीनमध्ये ते नीट निघत नाहीत. त्यावर थोडय़ा प्रमाणात मातीचा थर व अनेक कण तसेच राहतात. त्यासाठी आपल्या मशीनमध्ये क्विकवॉश ही सुविधा उपलब्ध असते.
याशिवाय जास्त जाड कपडे अर्थात चादरी, ब्लँकेट धुण्यासाठी पॉवर वॉश, स्वेटरसारखे नाजूक कपडे धुण्यासाठी जेन्टल वॉश अगर हार्ड वॉश यांसारखे प्रोग्राम आपल्या मशीनमध्ये असणे अतिशय गरजेचे असते.
सध्या काही कंपन्यांनी बाजारात आणलेल्या नव्या मॉडेलमध्ये आपल्याला अल्ट्रासोनिक स्टेन रिमूव्हर हे फीचर बाजारात आणले आहे. हे नक्कीच उपयुक्त फीचर असले तरी यासाठी चांगली रक्कम मोजावी लागत आहे.
जेवढे जास्त फंक्शन तेवढे जास्त कॉम्प्लिकेशन्स. त्यामुळे आपल्या गरजेइतकेच फंक्शन्स आपल्या मशीनमध्ये असलेले केव्हाही उत्तम. अर्थातच यावरील सर्व गोष्टींनंतर आपल्या वापरावरही मशीनचे आयुष्य अवलंबून असते.