scorecardresearch

डोकं लढवा

१. एका रांगेत काही मुले बसली आहेत. या रांगेत राकेशचा क्रमांक डावीकडून पाचवा आहे. तर पंकजचा क्रमांक उजवीकडून १३ वा आहे.

01doka१. एका रांगेत काही मुले बसली आहेत. या रांगेत राकेशचा क्रमांक डावीकडून पाचवा आहे. तर पंकजचा क्रमांक उजवीकडून १३ वा आहे. पंकज आणि राकेश यांच्यामध्ये तीन मुले आहेत. तर रांगेतील एकूण मुलांची संख्या किती?

२. एका घडय़ाळात आता ११ वाजून २७ मिनिटे झाली आहेत. तर त्याच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले वाटतील?

३. एका चौरसाचे क्षेत्रफळ ६२५ चौरसफूट आहे. तर त्या चौरसाची परिमिती १०० फूट आहे. मग त्या चौरसाची प्रत्येक बाजू किती फूट लांबीची असेल?

४. दसादशे १२ टक्के दराने २५००० रुपयांच्या मुद्दलावर तीन वर्षांनी किती व्याज मिळेल?

एका गवळ्याच्या घरी दररोज प्रत्येक गाय दिवसाला ८ लिटर दूध देते. गवळ्याला प्रति लिटर २७ रुपये याप्रमाणे दररोज १०८० रुपये मिळतात. तर गवळ्याच्या घरातील गाईंची एकूण संख्या किती?

उत्तरे स्पष्टीकरणासहित :

१. २१ मुले. स्पष्टीकरण : रांगेतील राकेशचा क्रमांक ५ वा, पंकजचा उजवीकडून म्हणजे विरुद्ध बाजूने १३ वा. एकूण संख्या १८. या दोघांमध्ये तीन मुले. म्हणजेच एकूण मुले १८+३=२१

२. १२ वाजून २३ मिनिटे. स्पष्टीकरण : आरशातील प्रतिमेत डावी व उजवी बाजू यांची अदलाबदल होते.

३. २५ फूट. स्पष्टीकरण : चौरसाची क्षेत्रफळ = बाजूचा वर्ग. तसेच चौरसाची परिमिती = ४ x बाजूची लांबी. त्यामुळे १००/४ किंवा ६२५ चे वर्गमूळ काढल्यास उत्तर २५ येईल.

४. ९००० रुपये. स्पष्टीकरण : सरळव्याज = (मुद्दल) (व्याजाचा दर) (कालावधी) /१०० या नियमाने गणित सोडविल्यास उत्तर ९ हजार येईल.

५. ५ गाई. स्पष्टीकरण : १०८०/ २७ = ४०, दररोज गवळी ४० लिटर दूध विकतो. त्याची प्रत्येक गाय ८ लिटर दूध देते. म्हणजेच एकूण गाईंची संख्या = ४०/८ म्हणजेच ५ गाई.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Word puzzle

ताज्या बातम्या