१९४० मध्ये कइट या बलाढय़ उद्योगसमूहाचे प्रमुख थॉमस वॅटसन यांनी पुढे भविष्यात सपशेल चुकलेले एक विधान केले होते. ते म्हणजे ‘जगात फार तर पाच संगणक विकले जातील.’ त्यानंतर आज सात दशके लोटली आहेत आणि जगातील संगणकांची संख्या अब्जांत मोजली जातेय. अर्थात त्या काळातील संगणकाचे अवाढव्य स्वरूप, किंमत आणि लष्करी अथवा सरकारी जनगणना यांसारख्या प्रचंड आकडेमोडीसाठी होत असलेला त्याचा वापर तेव्हा त्यांच्यासमोर असल्याने ते विधान त्यासंदर्भातच बघितले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याचे संगणक काय काय करू शकतात, यापेक्षा काय करत नाहीत, हे शोधून बघावे लागेल अशीच परिस्थिती आहे. खरं तर केवळ गणिती आकडेमोड जलद आणि कमी मानवी श्रमांत व्हावी याकरता गणन यंत्राचा मोठा भाऊ  अशा स्वरूपात या यंत्राची निर्मिती झाली. परंतु आज आपल्या आसपासच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक यंत्राचा भाग/ पायाभूत असण्यापर्यंत हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आकडेमोड करणारे यंत्र म्हणून असणारी ओळख पुसून ते आता कुठल्याही प्रकारच्या माहितीवर ( शब्द, आकडे, चित्रे, आवाज अशा कुठल्याही स्वरूपातील माहिती) प्रक्रिया करणारे यंत्र (Data Processing Machine) झाले आहे.  आवश्यक माहितीच्या आधारे शब्दश: काहीही करू शकणारे हे तंत्र खेळणी, भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर सोडलेल्या यानापर्यंत कुठलीही यंत्रे चालवू शकते. आणि हाच मूलभूत फरक गणन यंत्र (Calculator) आणि संगणक यामध्ये आहे. गणन यंत्र मनुष्याला चालवावे लागते, तर संगणक ठरवून दिलेल्या आज्ञेनुसार आपले काम स्वत:च करू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रजिज्ञासा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on computer
First published on: 04-10-2015 at 02:47 IST