मेघना जोशी

रोहन आणि किशोर हे दोघे जिवलग मित्र शाळेत सतत सोबत असतात. आता सातवीत आहेत, पण बालवाडीपासून एकाच बाकावर बसतात. दोघेही पूर्वी वागण्याबोलण्यात सारखेच होते, पण गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून थोडा बदल झालाय. रोहन किशोरपेक्षा थोडा वेगळा वागू लागलाय. थांबा.. थांबा. रोहन बिघडला.. असा विचार का केलात तुम्ही लगेच? वेगळा वागू लागला म्हणजे किशोरपेक्षा जरा जास्त चांगला वागू लागला. किशोरहून रोहन त्याच्या काकणभर सरस झालाय. हे कसं घडलं याचं सगळय़ांनाच नवल वाटतंय, अगदी किशोरलाही! पण त्याचं कारण मात्र समजत नव्हतं त्याला. शेवटी नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच किशोरनं विचारलंच त्याला, ‘‘रोहन, तू एवढा कसा काय बदललास रे गेल्या वर्षांत? इतरांचा आवडता झालायसच, पण माझाही जरा जास्त आवडता झाला आहेस तू हल्ली. मीही तुझ्यासारखं वागायचा प्रयत्न करतो, पण जमत नाहीय मला.’’

officers customs dayashankars
अन्यथा.. स्नेहचित्रे : नकोसा नैतिक!
memories balmaifal article
बालमैफल : कुपीचं गुपित
science school students loksatta news
ते काय असतं? : विज्ञानाची रंजक सफर!
readers reaction on lokrang article about Ajanthas PusatrehnaPadsad Indirabai
पडसाद : इंदिराबाई अधिक कळल्या
artist of human suffering Arpita Singh Neelima Sheikh Madhavi Parekh and Nalini Malani
मित्त : मानवी दु:खांच्या चित्रकार
What and how much do your children watch on social media
तुमची मुलं काय आणि किती पाहतात?
Biography of Rabindranath Tagore
रवींद्रनाथांचे रसाळ चरित्र
Screen Time Social Media YouTubers and Influencers
वखवख तेजाची न्यारी दुनिया…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

‘‘कसं जमेल! तुझ्याकडे माझ्या आजीसारखी आजी कुठे आहे?’’ रोहनच्या या बोलण्यावर किशोरनं प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहिलं. त्यावर रोहन हसत म्हणाला, ‘‘अरे, गेल्या वर्षी माझी आजी आलीय नाही का गावाहून आमच्याकडे. तिनं मला आनंदी, समाधानी आणि प्रसन्न राहण्यासाठीच्या वेगवेगळय़ा, पण छोटय़ा छोटय़ा युक्त्या सांगितल्यात, ज्यामुळे मी आधी होतो त्यापेक्षा जास्त आनंदी, समाधानी आणि प्रसन्न झालो.’’
‘‘पण आनंद, समाधान आणि प्रसन्नता म्हणजे सुख असं म्हणाले ना सर परवा. म्हणजे तू सुखी झालास म्हणून सगळय़ांना आवडू लागलास?’’
‘‘पूर्ण नाही काही, पण थोडासा झालो खरा सुखी.. त्यामुळे आवडता होतोय कदाचित सर्वाचा. तो कसा ते सांगतो तुला आता हळूहळू..
joshimeghana.23@gmail.com

Story img Loader