नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी मतदारसंघात ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा प्रकारची घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, या घोषणेविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली
आहे.
वाराणसीमध्ये मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर भगवान शंकराचे छायाचित्र लावण्यात आले होते. अशा प्रकारचे छायाचित्र लावणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. कोणताही माणूस देवाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारची घोषणाबाजी मोदींसाठी करणे अयोग्य आहे, असे काँग्रेसच्या विधी विभागाचे के. सी. मित्तल यांनी सांगितले.