सिंचनाचे पाणीवाटप हा राज्यातील वादाचा विषय ठरला असतानाच मंत्रिमंडळाने राजकारण्यांशी संबंधित संस्थांना पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नव्याने घेतला आहे.
राज्यातील ३२ घरगुती पाणीपुरवठा योजनांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार नगरपालिकेसह काही पालिकांना सिंचन योजनांतून पाणी देण्यात आले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या मदतीतून उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचाही त्यात समावेश आहे.
 पण काही खासगी संस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, या संस्था राजकारण्यांशी संबंधित आहेत. श्रीसंतमुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड, तालुका मुक्ताईनगर या खासगी कारखानाच्या वसाहतीसाठी पाणी देण्यात आले आहे. मुक्ताईनगर हा विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ असून, हा कारखाना जाधव चालवित असले तरी खडसे यांचा त्यावर वरदहस्त असल्याची माहिती जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून देण्यात आली. मात्र या कारखान्याशी खडसे यांचा काही संबंध नाही, असा दावा खडसे यांच्या कार्यालयातून करण्यात आला.
महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठान, कात्रज देहू रोड रस्ता, पुणे, जवाहर शिक्षण संस्था, नाशिक यासह काही राजकारण्यांशी संबंधित संस्थांचा समावेश आहे. यापूर्वीही सत्ताधाऱ्यांशी संबंधित संस्था किंवा साखर कारखान्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.