News Flash

मोदींना वाराणसीत कडवे आव्हान देण्याचा सोनियांचा निर्धार

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी वाराणसी हा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ निवडला आह़े

| March 27, 2014 04:21 am

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी वाराणसी हा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ निवडला आह़े  भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही़  परंतु, आम्ही मोदींना निश्चितच कडवे आव्हान देऊ, असा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे व्यक्त केला़  पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़ काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांचे नाव वाराणसीच्या जागेसाठी चर्चेत होत़े  दिग्विजय यांनी मात्र त्याचा इन्कार केला होता़  मात्र आता सोनियांनी मोदींविरोधात सक्षम उमेदवार देण्याचे स्पष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 4:21 am

Web Title: will definitely challenge narendra modi in varanasi sonia gandhi
टॅग : Lok Sabha Election
Next Stories
1 केजरीवालांकडून जनतेची फसवणूक
2 निवडणूक प्रचारातील मुलांच्या ‘वापरा’वर बंदी
3 वामनराव चटप यांची मते निर्णायक ठरणार
Just Now!
X