पद वाचवण्यासाठी निहालचंद यांच्या भेटीगाठी

बलात्काराच्या आरोपावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले केंद्रीय मंत्री निहालचंद मेघवाल यांनी गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

बलात्काराच्या आरोपावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले केंद्रीय मंत्री निहालचंद मेघवाल यांनी गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. पक्षाने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मेघवाल यांनी घेतल्याचे मानले जात आहे.मेघवाल यांनी या खटल्याबद्दल राजनाथ सिंह यांना माहिती दिली. माध्यमांशी काहीही बोलू नये, असा सल्ला राजनाथ सिंह यांनी मेघवाल यांना दिला आहे. ४२ वर्षीय मेघवाल हे राजस्थानमधील एकमेव केंद्रीय मंत्री आहेत. २०११ मध्ये बलात्काराच्या प्रकरणात प्राथमिक माहिती अहवालात त्यांचे नाव आले. त्यानंतर २०१२ मध्ये आरोप खोटे असल्यावरून राजस्थान पोलिसांनी हे प्रकरण बंद केले. त्यानंतर जिल्हा न्यायालयात संबंधित महिलेने धाव घेतली. या न्यायालयाने आरोप फेटाळले. त्यानंतर संबंधित महिलेने फेरयाचिका दाखल केली आहे. त्यावर मेघवाल आणि इतर १७ जणांना २० ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp backs rape accused mos nihal chand