scorecardresearch

काँग्रेस-भाजपने देणगीदारांची नावे जाहीर करावीत

काँग्रेस आणि भाजपला कोणाकडून देणग्या मिळाल्या त्यांची नावे त्या पक्षांनी जाहीर करावी, असे आव्हान आम आदमी पक्षाने दिले आहे

काँग्रेस आणि भाजपला कोणाकडून देणग्या मिळाल्या त्यांची नावे त्या पक्षांनी जाहीर करावी, असे आव्हान आम आदमी पक्षाने दिले आहे. या देणग्यांपैकी ८० टक्क्य़ांहून अधिक रक्कम प्रचारासाठी खर्च करण्यात आली असल्याचेही आपने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना देणग्या स्वीकारल्याबद्दल दोषी ठरविले आहे. यावर या दोन्ही पक्षांनी मौन पाळले आहे. त्यावरून काँग्रेस आणि भाजप बडय़ा कंपन्यांकडून देणग्या स्वीकारून अवाजवी लाभ त्या कंपन्यांना मिळवून देत असल्याचे सिद्ध होते, असे आपने म्हटले आहे.काँग्रेस आणि भाजपने ब्रिटनस्थित वेदांत कंपनीशी संलग्न असलेल्या कंपन्यांकडून देणग्या स्वीकारल्याने कायद्याचे उल्लंघन होत आहे, त्यामुळे या पक्षांवर कारवाई करावी, असा आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिला.

गतवेळेस शरद पवार यांना मोठा विश्वास दाखवून निवडून दिले. परंतु त्यांनी विश्वासघातच केला. त्यांनी माढय़ाकडील दुष्काळी भागाला वाऱ्यावर सोडून दिले. आमच्या घराण्यात भांडणेही लावली. स्वाभिमान गहाण न ठेवता व लाचारी न पत्करता निवडणूक मैदानात उतरलो आहे.
-प्रतापसिंह मोहिते-पाटील (अपक्ष)

 feud family ruins sharad pawar prestige in madha constituency

मराठीतील सर्व लोकसभा ( Loksabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress bjp should declare their fund aap