बिहारमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध मतदान करणाऱ्या जद(यू)च्या १८ बंडखोर आमदारांवर शिस्तभंगाची नोटीस बजावण्याची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे संकेत मिळत आहेत.
 पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान न करणे आणि अन्य आमदारांनाही मतदान न करण्यासाठी चिथावणी देणे याबाबतचा अहवाल पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे सादर करण्यात आला असल्याचे संसदीय कामकाजमंत्री श्रावणकुमार यांनी सांगितले.  बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.