निवडणूक आयोगाला मोदींचे आव्हान

नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर निष्पक्ष वर्तनाबाबत शंका उपस्थित केली. पश्चिम बंगाल, बिहार आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मतदान केंद्र बळकावण्याच्या घटना घडल्या.

नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर निष्पक्ष वर्तनाबाबत शंका उपस्थित केली. पश्चिम बंगाल, बिहार आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मतदान केंद्र बळकावण्याच्या घटना घडल्या. त्यावर आयोगाने काहीही कारवाई केलेली नाही, असा आरोप मोदींनी केला. हिंमत असेल तर आपल्या विरोधात कारवाई करावी, असे आव्हान मोदींनी दिले.
गैरप्रकारांचे आरोप असताना तुम्ही कारवाई का करत नाही, तुमचा हेतू काय, असा सवाल विचारत माझ्या बोलण्याबाबत आक्षेप असेल तर गुन्हा दाखल करा, असे आव्हान त्यांनी असनसोल येथील सभेत
दिले. गांधीनगरमध्ये मतदानानंतर कमळ दाखवल्याबद्दल आयोगाने यापूर्वीच मोदींच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्र बळकावणे आणि निवडणूक हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यात आयोगाला अपयश आल्याचा आरोप मोदी यांनी केला.
 निष्पक्षपणे निवडणुका व्हाव्यात, ही आयोगाची जबाबदारी आहे. यात आयोगाला अपयश येत असल्याचा गंभीर आरोप आपण करत आहोत, बाबुल सुप्रियो या आमच्या उमेदवाराच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचा आरोप मोदींनी केला.बांकुरा येथील सभेत मोदींनी ममतांची खिल्ली उडवली. काही दिवसांपूर्वी ममतांनी मोदींचा उल्लेख कागदी वाघ असा केला होता. शारदा चीटफंड घोटाळ्याच्या दोषींना तुरुंगांत डांबून गरिबांना त्यांचे पैसे परत मिळवून देणारे खरे वाघ आहेत. बांगलादेशी घुसखोरांना मतपेढीच्या राजकारणासाठी देशात प्रवेश करू दिला नाही, याचा पुनरुच्चार मोदींनी पुन्हा एकदा केला.
पक्षाची सावध प्रतिक्रिया
मोदींनी निवडणूक आयोगाला आव्हान दिल्यावर दिल्लीत मात्र भाजपने सारवासारव केली आहे. मोदींनी आव्हान दिले नाही तर इतर राजकीय पक्षांनी याबाबत कारवाईसाठी जसे सुचवले तसेच मोदींनी सांगितले, असे भाजप प्रवक्ते असे भाजप प्रवक्ते एम.जे. अकबर यांनी सांगितले. एम.जे. अकबर यांनी सांगितले.
बंगाली व्यक्तीला हात तर लावा – ममतांचे आव्हान
रानघाट:पश्चिम बंगालमधील एकाही व्यक्तीला हात लावून बघा, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले. पश्चिम बंगालच्या एकाही व्यक्तीला हात तर लावा, आपण दिल्लीत धडक देऊ, असा इशाराही त्यांनी मोदींचा नामोल्लेख न करता केला. मोदी यांनी सभांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Narendra modi dares ec to file another case against him questions its impartiality

ताज्या बातम्या