• जिरायती कापूस शेतीसाठी बियाणांच्या एकेएच ४ व ५, एकेए ८४०१ या देशी जाती आहेत. अमेरिकन – डीएचवाय २८६, एसआरटी-१, डीकेएच ०८१. संकरीत जाती – संकर -१, संकर-६, पी.के. व्ही, संकर-२.
  • बागायत कापूस शेतीसाठी सुधारित एलआरए ५१६६, ५१६६, आरएचसी १, संकरीत – वरलक्ष्मी, सावित्री, डीसीएच-३२ या जातींना शेतकऱ्यांकडून पसंती दिली जाते.
  • पेरणी – जूनचा पहिला किंवा दुसरा आठवडा चांगला. मान्सून पेरणी – जूनचा तिसरा किंवा चौथा आठवडा. बागायत – पुणे, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्य़ात मार्चचा पहिला पंधरवडा, अहमदनगरमध्ये एप्रिलचा पहिला पंधरवडा, विदर्भ व मराठवाडा भागात धुळे, नंदूरबार व जळगाव या जिल्ह्य़ांत मे महिन्याचा दुसरा आठवडा.
  • बियाणे – जिरायत कापूस शेतीसाठी देशी हेक्टरी १५ ते २० किलो, अमेरिकन बियाणे हेक्टरी १२ ते २० किलो या प्रमाणात वापरली जातात. संकरीत हेक्टरी ४ किलो या प्रमाणात. बागायतीसाठी – सुधारित जाती हेक्टरी ७ ते ८ किलो या प्रमाणात वापरतात. तर संकरीत जाती हेक्टरी २.५ ते ३ किलो या प्रमाणात वापरण्यात येतात.
  • पेरणी – देशी जातीची ४५ बाय २२.५ सें. मी. या अंतराने पेरणी करण्यात येते. अमेरिकन जाती ६० बाय ३० सें.मी., संकरीत जाती – ६० बाय ६० सें. मी., ७५ बाय ७५ सें.मी. तसेच ९० बाय ९० सें.मी या अंतराने पेरणी करण्यात येते.