• जुलै अखेरीसही देशभरात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांना यंदा भरघोस उत्पादन घेण्याची संधी आहे. सुमारे दशकभरानंतर सर्वोत्तम सरासरी नोंदविल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  • जुलैमध्ये सरासरी ७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या या पावसामुळे गेल्या दोन वर्षांतील तूट भरून काढणे शक्य होणार आहे.
  • या पावसामुळे रब्बी मोसमातील पिकांना फायदा होणार आहे. सुमारे दशकभरानंतर पावसाने सर्वोत्तम सरासरी नोंदविली आहे.
  • मागील काही वर्षांमध्ये आयात कराव्या लागलेल्या उत्पादनांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
  • केंद्र सरकारने २७०.१ दशलक्ष टन उत्पादन घेण्याचे ध्येय निश्चित केले होते. गतवर्षीच्या तुलनेत हे सात टक्के अधिक आहे.
  • तेलबियाणांखालील मोठे क्षेत्र असून यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

अपघात विमा योजनेला चहा उत्पादकांचा प्रतिसाद

  • आसामसह ईशान्येकडील इतर राज्ये तसेच पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, हिमाचल प्रदेश या राज्यांत चहा मंडळाने लहान चहा उत्पादकांसाठी सुरू केलेल्या अपघात विमा योजनेस शेतकऱ्यांनी उत्साही प्रतिसाद दिला आहे.
  • चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे १८ ते ७० वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • या विमा योजनेत चहा उत्पादक विमाधारकाची ७५ टक्के रक्कम चहा मंडळाकडून देण्यात येणार आहे. तर २५ टक्के रक्कम शेतकऱ्याकडून घेण्यात येईल.