26 May 2020

News Flash

बाजारपेठेचाही अभ्यास हवा!

पेरणीपासून ते काढणीपर्यंत नाना अडचणींना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते.

गतवर्षी सोयाबीनचा भाव ३८०० रुपये िक्वटल होता. या वर्षी तब्बल हजार रुपये भाव कमी झाला २८०० रुपयांनी सोयाबीन विकले जाऊ लागले. अतिवृष्टीमुळे सोयाबीनची गुणवत्ता घसरली. मालात ओलावा वाढला, त्यामुळे १५०० रुपये िक्वटलपासून सोयाबीन बाजारपेठेत विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. गेल्या महिनाभरापासून राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने झाली.

पेरणीपासून ते काढणीपर्यंत नाना अडचणींना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. काढणी झाल्यावरही त्याची अडचण दूर होत नाही. जोपर्यंत बाजारपेठेत जाऊन योग्य भावाने माल विकला जात नाही तोपर्यंत त्याला शांत झोप येत नाही. पेरणीच्या वेळी पुरेसा पाऊस पडला आहे का? पेरलेले उगवेल का? उगवले तर पुन्हा पाऊस पडला नाही तर ते वाचेल कसे? वाचले तर कीड व अन्य रोगांपासून त्याचा बचाव करण्यासाठी योग्य औषध मिळेल का? मिळालेल्या औषधाचा उपयोग कीडनाशासाठी होईल का? यापासून ते रोज नव्या प्रश्नाला त्याला सामोरे जावे लागते. अशा अनंत अडचणींतून शेतमालाची कापणी, मळणी झाल्यानंतर बाजारपेठेत जेव्हा माल न्यायचा तेव्हा भाव पडलेले असतात. बाजारपेठेत आता माल नेला नाहीतर पुन्हा भाव वाढेल, की पडेल? खर्चासाठी पसे आणायचे कुठून? या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसते अन् नेमका त्याचाच फायदा बाजारपेठेतील यंत्रणा उठवत असते. वर्षांनुवष्रे याच दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला आहे. राज्य शासनाच्या वतीने मालतारण योजना जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या व्याजापेक्षा कमी व्याजदराने मालतारण सेवा उपलब्ध आहे. मोठे शेतकरी याचा लाभ घेतात किंवा खासगी गोदामात माल ठेवतात, पण छोटय़ा शेतकऱ्यांचे काय? हा प्रश्न पुन्हा निरुत्तरित राहतो. गेले तीन वष्रे दुष्काळ असल्यामुळे बाजारपेठेत मालाची आवक कमी अन् शेतमालाचे भाव गगनाला भिडलेले होते. या वर्षी पाऊस चांगला झाला, उत्पादन वाढले, मात्र पडलेले भाव असल्यामुळे शेतकऱ्याची स्थिती पिकून, न पिकून सारखीच झाली आहे.

गतवर्षी सोयाबीनचा भाव ३८०० रुपये िक्वटल होता. या वर्षी तब्बल १ हजार रुपये भाव कमी झाला व २८०० रुपयांनी सोयाबीन विकले जाऊ लागले. अतिवृष्टीमुळे सोयाबीनची गुणवत्ता घसरली. मालात ओलावा वाढला, त्यामुळे १५०० रुपये िक्वटलपासून सोयाबीन बाजारपेठेत विकण्याची वेळ आली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सोयाबीनचा पेरा वाढला आहे. या वर्षी देशात सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. देशाच्या उत्पादनापकी ३० टक्के उत्पादन एकटय़ा महाराष्ट्रात होते.

बाजारपेठेचा अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. हमीभावापेक्षा कमी भावाने बाजारपेठेत माल विकला जातो आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यात सुमारे ५० लाख टन सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने झाली. २७७५ रुपये सोयाबीनचा हमीभाव आहे. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी केली जाणार असल्याचे घोषित केले आहे. या घोषणेमुळे आता सोयाबीनचे भाव वाढतील. मात्र, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे काय? हा यक्षप्रश्न आहे.

गेली काही वर्षे अल निनोचा परिणाम भारतातील शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. आता या वर्षी याचा फटका उत्तर व दक्षिण अमेरिकेत बसेल. असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. सोयाबीनचे उत्पादन भारताच्या चाळीसपट अमेरिकेत होते. तेथे उत्पादन घटले तर स्थानिक बाजारपेठेत आपल्या सोयाबीनचा भाव वाढण्याची चिन्हे आहेत. गतवर्षी ७० लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते. मात्र, त्यापूर्वी ३० लाख टन शिल्लक होते. या वर्षी १०० लाख टनापेक्षा अधिक उत्पादन झाले तर फारसे सोयाबीन शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढले म्हणून भाव पडतो आहे हे वास्तव नाही. जाणीवपूर्वक बाजारपेठेत हे षड्यंत्र रचले जात आहे.

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. वायदे बाजारात उपलब्ध असणारे भाव काय आहेत? तीन महिन्यांनंतर भाव काय राहतील? याचा अभ्यास करून गरजेनुसारच माल बाजारपेठेत विकला पाहिजे. या वर्षी सोयाबीनचे भाव चढे राहतील. लातूरच्या कीर्ती ग्रुपने ५ नोव्हेंबरपासून सोयाबीनचा भाव २९५०, डिसेंबर महिन्यात ३१००, जानेवारी महिन्यात ३१६० तर फेब्रुवारीत ३२६० जाहीर केला आहे. या भावानुसार खरेदी केली जाणार असल्याचे कीर्ती ग्रुपचे प्रमुख अशोक भुतडा यांनी सांगितले.

वायदे बाजारातही सोयाबीनचा भाव चढाच आहे. २० नोव्हेंबपर्यंत ३०९९, २० डिसेंबपर्यंत ३१८१, २० जानेवारीपर्यंत ३२५५ तर २० फेब्रुवारीपर्यंत ३३३० रुपये हा भाव आहे. आता शेतकऱ्याने आपले सोयाबीन खासगी गोदामात, घरी अथवा शासकीय गोदामात ठेवले, तर तीन महिन्यांनंतर किमान ५०० रुपये प्रतििक्वटल चढा भाव मिळू शकतो. बँकेच्या व्याजासकट व साठवणुकीसाठी दरमहा प्रतििक्वटल ३५रुपये इतकाच खर्च येतो.

शेतकऱ्याला त्याच्या भावात किमान १५ ते २० टक्केपर्यंत वाढीव लाभ मिळू शकतो. बाजारपेठेत दरवर्षी केवळ बाजारपेठेचा अभ्यास करून पाण्यावर लोणी काढणाऱ्या मंडळींचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी आता या बाबतीत सजग व्हायला हवे. या वर्षी मुगाची खरेदी ही हमीभावापेक्षा कमी भावाने झाली. बाजारपेठेत मुगाची अजून आवक येतेच आहे. मुगाचा भावही आणखीन ५०० रुपयांपर्यंत वाढू शकतो. उडदाचा भाव ७५०० रुपये प्रतििक्वटल आहे. चांगल्या प्रतीच्या उडदाला भाववाढ मिळू शकते.

मागील वर्षीचा हरभरा ज्यांच्याकडे शिल्लक आहे त्यांनी तो आताच तातडीने विकला पाहिजे, कारण आता हरभऱ्याला सर्वाधिक भाव आहे. तीच अवस्था तुरीची आहे. तुरीचा भाव यापेक्षा वाढणार नाही. या वर्षी तुरीचे उत्पादन अधिक असल्यामुळे बाजारपेठेत जेव्हा तूर येईल तेव्हा हमीभावापेक्षा कमी भावाने तूर व रब्बी हंगामातील हरभरादेखील विकण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता बाजारपेठेचा अभ्यासही शेतीच्या उत्पादनवाढीप्रमाणेच करायला हवा. तरच काही प्रमाणात योग्य भाव मिळविणे शक्य होईल आणि त्याचा लाभ अर्थातच शेतकऱ्याला होईल.

  • राज्य शासनाने बाजारपेठेतील भावाच्या घसरणीचा व चढेपणाचा अंदाज लक्षात घेऊन जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येईल, तेव्हा खरेदीची साठवणूक मर्यादा उठवली पाहिजे किंवा प्रत्येक मालाचा वाढीव भाव निश्चित करून त्यापेक्षा जास्त वाढला तरच साठवणूक मर्यादा घातली पाहिजे.
  • सोयाबीनमध्ये १८ टक्के तेल निघते व ८२ टक्के डीओसी (पेंड) निघते. आपल्याकडील सोयाबीन हे जैवतंत्रज्ञानामुळे विकसित केलेले नसल्यामुळे यातील प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणून बाजारपेठेत आपल्या सोयाबीनच्या पेंडीला अधिक मागणी आहे.
  • या पेंडीपासून सोयाबीन आटा बनतो, सोयाबीनची वडी बनते. माशांसाठी व कोंबडय़ांसाठी अतिशय पौष्टिक खाद्य म्हणून जगभर या पेंडीला मागणी आहे. याशिवाय सोयाबीनची डाळ, दूध असे सोयाबीनवर प्रक्रिया करूनही अनेक पदार्थ तयार केले जातात.

जागतिक सोयाबीन पिकाचा वार्षकि तक्ता

  • अमेरिका- पेरणी (मे, जून), पीकवाढ (जुल, ऑगस्ट), काढणी (सप्टेंबर ते नोव्हेंबर)
  • ब्राझील- पेरणी (नोव्हेंबर, डिसेंबर), पीकवाढ (जानेवारी, फेब्रुवारी), काढणी (मार्च ते मे)
  • अर्जेटिना- पेरणी (नोव्हेंबर, डिसेंबर), पीकवाढ (जानेवारी, फेब्रुवारी), काढणी (मार्च ते मे)
  • चीन- पेरणी (एप्रिल, मे), पीकवाढ (जून, जुल), काढणी (ऑगस्ट ते ऑक्टोबर)
  • भारत- पेरणी (जून, जुल), पीकवाढ (ऑगस्ट), काढणी (सप्टेंबर ते नोव्हेंबर)

Pradeep

nanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2016 12:08 am

Web Title: market study
Next Stories
1 विक्री व्यवस्था हीच डोकेदुखी
2 हरितगृह शेती गोत्यात का आली?
3 कृषी पर्यटनातील अर्थसंधी
Just Now!
X